शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

सादळे मादळे शिवारात शिरला १४ गव्यांचा कळप,‌ शेतीचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 23:28 IST

हा गव्यांचा कळप दिवसा व रात्री सादळे मादळे, मनपाडळे शिवारात धुडगूस घालून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांवर डल्ला मारुन फस्त करत आहेत.

सतीश पाटील 

शिरोली :  मादळे (ता.करवीर) येथील कोरवी आणि दर्गा शेत शिवारात चौदा गव्यांच्या कळप आला असून तो रविवारी सकाळी ९ वाजता शेतकरयांना नजरेस पडला. सादळे मादळे येथील जंगलात कोरवी आणि दर्गा शेत शिवारात, रस्त्यावर गव्यांचा बोलबाला असुन रविवारी सकाळी नऊच्या सुमारास १४ गव्यांचा कळप मनपाडळे डोंगरातून जोतिबा टोप मुख्य रस्ता पार करून कोरवी यांच्या शेता नजिकच्या कुरुण शेतातुन पोहाळे गावच्या दिशेने झाडी मध्ये गेला. यामध्ये पूर्ण वाढ झालेले ११ तर ३ लहान पिलांचा समावेश आहे. हा गव्यांचा कळप दिवसा व रात्री सादळे मादळे, मनपाडळे शिवारात धुडगूस घालून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांवर डल्ला मारुन फस्त करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून १४ गव्यांच्या कळप गिरोली, सादळे मादळे, भुयेवाडी, कासारवाडी, मनपाडळे, पाडळी, अंबपवाडी जंगल परिसरात तळ ठोकुन आहे. कडक उन्हाळा सुरू असल्यानं पाणी आणि हिरव्या चाऱ्यांच्या शोधत गव्यांनी आपला मोर्चा शिवारातील ओल्या पिकांकडे वळवला आहे. या‌‌ परिसरात हिरवा उस, ज्वारी, मका, हि पिक खायला मिळतात, मनपाडळे चा‌ तलाव, भुयेवाडी तलाव मुबलक पाणी असल्याने हे गवे येथेच ठाण मांडून आहेत.‌ या गव्यांकडुन गेल्या महिनाभरापासून सादळे मादळे शिवारात धुडगूस सुरू असून मादळे येथील दिलिप कोरवी, प्रविण कोरवी ,तुकाराम पोवार, कमल पोवार, महिपती पोवार, अमित पोवार, मुमताज पटेल, शंकर पोवार यांच्या सह अन्य शेतकऱ्यांच्या उस, मका, ज्वारी आदी पिकांचे या गव्यांनी मोठे नुकसान केले आहे. सध्या दिवसा व रात्री शिवारात गव्यांचा धुडगूस सुरू असून रात्री अपरात्री शेत शिवारात, गावाबाहेर इतरत्र एकटे जाणं मुश्किल बनलं आहे. वनविभागाने शेतकरयांना पिकांची नुकसान भरपाई तातडीने देऊन गव्यांना नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर