...तिला हवाय हक्काचा निवारा
By Admin | Updated: August 28, 2014 23:37 IST2014-08-28T23:26:32+5:302014-08-28T23:37:28+5:30
पंचवीस वर्षे पाठपुरावा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

...तिला हवाय हक्काचा निवारा
बाजारभोगाव : हक्काची पसाभर जागा नाही... मोलमजुरी करायची अन् पोट भरायचं... परिस्थितीशी हार न मानता दोन हात करीत मोडक्या संसाराला बळ देत सन्मानानं जगायचं... हक्काच्या घरासाठी प्रशासनाचे उंबरठे चढून मरणयातनेचे भोग सोसावे लागत आहेत. हा अनुभव पिसात्री (ता. पन्हाळा) येथील नानूबाई वरुटे या महिलेचा.
नानूबाई हिचा तीस वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. मात्र, संसाराच्या आनंदाला नियतीची दृष्ट लागली. अवघ्या दोन-तीन वर्षांत मांडलेला संसार मोडला अन् नानूबाईवर आकाश गडगडून पडले. माहेरी सन्मानाने जगण्यासाठी मनगटातील ताकदीवर मुलीला मोठे केले. तिचा विवाह केला. हक्काची पसाभर जागा नाही. गरिबीचे चटके बसूनही इच्छाशक्तीच्या जोरावर हक्काचे घरकुल व्हावे, अशी पंचवीस वर्षांपासून तिची इच्छा आहे. तिने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
नानूबाई वरुटे या दारिद्र्यरेषेखाली आहेत. घरकुलसाठी त्यांनी पंचायत समितीकडे कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करावा, प्राधान्याने त्यांचा घर व जागेचा प्रश्न सोडवू.
- सुवर्णा प्रकाश पाटील उपसभापती, पन्हाळा पंचायत समिती