जवानांच्या गावी मदत करणे भाग्याचे : मनीषा रोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:09+5:302021-08-20T04:29:09+5:30
दत्तवाड : सैनिक परंपरा असलेले या गावाने देशसेवेसाठी आजअखेर १८ जवानांनी हौतात्म्य पत्करले आहे. एकाच कुटुंबातील चौथ्या पिढीपर्यंत ...

जवानांच्या गावी मदत करणे भाग्याचे : मनीषा रोटे
दत्तवाड : सैनिक परंपरा असलेले या गावाने देशसेवेसाठी आजअखेर १८ जवानांनी हौतात्म्य पत्करले आहे. एकाच कुटुंबातील चौथ्या पिढीपर्यंत देश सेवेची परंपरा जोपासणारे देशातील एकमेव गाव असल्याने या गावाचा सार्थ अभिमान वाटतो. अशा या जवानांच्या गावी मदत करताना एक वेगळ्या प्रकारचे समाधान लाभत असल्याचे मत महिला काँग्रेस संघटित व असंघटित प्रदेश सरचिटणीस ॲड. मनीषा रोटे यांनी व्यक्त केले.
सैनिक टाकळी येथे महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटी संघटित-असंघटित विभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲड. मनीषा रोटे व भवानीसिंग घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक टाकळी व दत्तवाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सुषमा राजेघोरपडे, वैशाली जाधव, मनीषा पाटील, प्रिया आलेकरी, विद्या मोरे उपस्थित होते. स्वागत उपसरपंच सुदर्शन भोसले तर संतोष गायकवाड यांनी आभार मानले.