शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांची मदत, नक्षलग्रस्तांंना दिवाळी भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:06 IST

सतत नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी होरपळणारी गावे, सामाजिक आणि आर्थिक समस्यांमुळे सततचा मागासलेपणा यांमुळे येथील ग्रामस्थांना कोणता आलाय सण-वार... या नक्षलग्रस्त भागांतील ग्रामस्थांची यंदाची दिवाळी द्विगणित करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कोल्हापुरातील तरुण मंडळांनी एक ट्रक जुने कपडे जमा केले आहेत. दिवाळीचे औचित्य साधून हे कपडे नक्षलग्रस्त भागांत पाठविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरकरांची मदत, नक्षलग्रस्तांंना दिवाळी भेट सार्वजनिक मंडळाचा उपक्रम; एक ट्रक जुने कपडे जमा

प्रदीप शिंदे

 कोल्हापूर : सतत नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी होरपळणारी गावे, सामाजिक आणि आर्थिक समस्यांमुळे सततचा मागासलेपणा यांमुळे येथील ग्रामस्थांना कोणता आलाय सण-वार... या नक्षलग्रस्त भागांतील ग्रामस्थांची यंदाची दिवाळी द्विगणित करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कोल्हापुरातील तरुण मंडळांनी एक ट्रक जुने कपडे जमा केले आहेत. दिवाळीचे औचित्य साधून हे कपडे नक्षलग्रस्त भागांत पाठविण्यात येणार आहेत.सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ उद्देश आज कालबाह्य होताना दिसत आहे. त्याची जागा इव्हेंटने घेतली असल्याची टीका सर्वत्र होताना दिसते. मात्र कोल्हापुरातील काही गणेशोत्सव मंडळे मात्र, याला अपवाद ठरली आहेत. विविध उपक्रमांद्वारे या मंडळांनी सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचललेला आहे.व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट, अक्षय मित्र मंडळ आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने पुढाकार घेऊन गणेशोत्सव काळात विविध मंडळांकडे नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांसाठी जुने कपडे देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विधायक उपक्रमास मंडळांनीही चांगलाच प्रतिसाद दिला.

इतकेच नव्हे, तर त्यांनी या काळात आपल्या परिसरातून जुने कपडे जमा करण्याचे काम उत्स्फूर्तपणे सुरूही केले. काही मंडळांनी तर अनावश्यक खर्च कमी करीत या उपक्रमासाठी नवीन कपडेही खरेदी केले. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम केलेले जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे कपडे योग्य ठिकाणी पोहोच करण्यात येणार आहेत.

जुन्या पण स्वच्छ कपड्यांना इस्त्री...जमा झालेले हे ट्रकभर जुने कपडे अंबाई डिफेन्स कॉलनी येथील व्हिजन ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्या घरी एकत्र करण्यात आले. ते स्वच्छ धुऊन त्यांना इस्त्री केल्याने अगदी नव्यासारखे दिसत आहेत. अनेकांनी चांगले कपडे दिले आहेत, तसेच अगदीच जीर्ण झालेले कपडे न पाठविता बाजूला ठेवले आहेत.

शनिवारी भव्य कार्यक्रमया उपक्रमासाठी शहरातील अनेक गणेश मंडळांनी सहकार्य केले. शनिवारी (दि. २०) शाहूपुरी पोलीस ठाण्यात सकाळी दहा वाजता होणाऱ्या भव्य कार्यक्रमात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कपड्यांनी भरलेला ट्रक गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना करण्यात येणार आहे. या ट्रकसोबत कोल्हापुरातील युवकांचे पथकही जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात एकत्र येणारी युवकांची शक्ती विधायक कार्याकडे वळविण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला. उत्सवाचे औचित्य साधून सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांसाठी हे जुने कपडे जमा केले आहेत.- संताजी घोरपडे, अध्यक्ष, व्हिजन ट्रस्ट

 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस