ईदच्या खर्चास फाटा देत आरोग्य केंद्रास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST2021-05-23T04:23:45+5:302021-05-23T04:23:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : कोरोनाचे संकटाच्या पार्श्वभूमीवर सेनापती कापशी (ता.कागल ) येथील सुन्नत मुस्लीम जमातीच्यावतीने यंदाही रमजान ...

ईदच्या खर्चास फाटा देत आरोग्य केंद्रास मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : कोरोनाचे संकटाच्या पार्श्वभूमीवर सेनापती कापशी (ता.कागल ) येथील सुन्नत मुस्लीम जमातीच्यावतीने यंदाही रमजान ईद साधेपणाने साजरी केली. ईदच्या खर्चात बचत करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमारे पन्नास हजार रुपयांची औषधे व लागणारी उपकरणे मदत केली.
गेल्या वर्षीही ईदच्या सणावर कोरोनाचे सावट होते. त्यावेळी जवळपास बारा कुटुंबांना सुन्नत मुस्लीम जमात, कापशी यांच्यावतीने महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या होत्या.
मुस्ताक देसाई, अमीर पटवेगार आणि मेहबूब मुल्लाणी यांनी ईदच्या खर्चास फाटा देत मुस्लीम समाजाच्यावतीने कापशी प्राथमिक आरोग्य केंद्राला औषधे व उपकरणे भेट दिली.
यावेळी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, रुग्ण कल्याण समिती सदस्य शेखर स्वामी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल शिंदे व स्टाफ, सुनील चौगले, शशिकांत काकडे, प्रवीण नाईकवाडे, रोहित लठ्ठे, आप्पासो माळी आदी उपस्थित होते.
२२
फोटो:- रमजान ईदच्या खर्चास फाटा देत सेनापती कापशी (ता.कागल) प्राथमिक आरोग्य केंद्रास औषधे भेट देताना शशिकांत खोत, सुनील चौगले, अमिर पटवेगार, मुस्ताक देसाई, मेहबूब मुल्लानी, डॉ. विशाल शिंदे व इतर.