उंदरवाडीच्या 'त्या' कुटुंबाला मदतीचा ओघ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST2021-07-20T04:18:55+5:302021-07-20T04:18:55+5:30

बोरवडे : उंदरवाडी (ता. कागल) येथील गावपाळक सादवणाऱ्या मंगल साताप्पा कांबळे यांच्या ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेऊन तळाशीचे ज्येष्ठ ...

Help continues to flow to 'that' family of Undarwadi | उंदरवाडीच्या 'त्या' कुटुंबाला मदतीचा ओघ सुरूच

उंदरवाडीच्या 'त्या' कुटुंबाला मदतीचा ओघ सुरूच

बोरवडे : उंदरवाडी (ता. कागल) येथील गावपाळक सादवणाऱ्या मंगल साताप्पा कांबळे यांच्या ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेऊन तळाशीचे ज्येष्ठ नेते मारुतराव जाधव (गुरुजी) यांनी कांबळे कुटुंबीयांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन बांधकाम समिती सभापती वंदना जाधव यांच्या हस्ते मंगल कांबळे यांना त्यांच्या घरी जाऊन रोख रक्कम देण्यात आली. याप्रसंगी राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अरुणराव जाधव, एस. के. पाटील, व्ही. जे. साबळे, एन. के. जाधव, बी. बी. पाटील, पी. टी. पाटील, एम. एच. पाटील, एल. डी. चौगले, सौरभ पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते. आभार बी. बी. पाटील यांनी मानले.

१९ उंदरवाडी मदत

फोटो ओळी :

उंदरवाडी (ता. कागल) येथील गावपाळक सादवणाऱ्या मंगल कांबळे यांना मदत देताना बांधकाम समिती सभापती वंदना जाधव, ज्येष्ठ नेते मारुतराव जाधव गुरुजी, अरुणराव जाधव व इतर.

Web Title: Help continues to flow to 'that' family of Undarwadi