शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Jotiba Chaitra Yatra 2026: अवजड वाहनांना सोमवारपासून जोतिबा डोंगरावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:14 IST

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान होत असलेल्या चैत्र यात्रेनिमित्त सोमवारपासून (दि. ३०) मालाने भरलेले ...

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान होत असलेल्या चैत्र यात्रेनिमित्त सोमवारपासून (दि. ३०) मालाने भरलेले ट्रक, अवजड वाहने, तीनचाकी प्रवासी व माल वाहतूक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना डोंगरावर केर्ली, कुशिरे, वाघबीळ, गिरोली या नाकाबंदी ठिकाणाहून पुढे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी हे निर्बंध घातले आहेत. वाहतुकीचे एकेरी मार्ग व प्रवेश बंदीचे नियम १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत राहतील.मुख्य यात्रा १ तारखेला असून या दिवशी सकाळी ५ वाजल्यापासून दुचाकी वाहनांना डोंगरावर दानेवाडी क्रॉसिंग आणि जुने आंब्याचे झाड, गिरोली फाटा येथून प्रवेश दिला जाणार नाही. पार्किंगच्या ठिकाणाहून मोफत एसटी किंवा केएमटीचा वापर करावा. डोंगर ते जुने आंब्याचे झाड या दरम्यान वाहतूक दोन्ही मार्गाने सुरू राहील.दर्शनानंतर परत जाणाऱ्या भाविकांनी गिरोली मार्गे तसेच जुने आंब्याचे झाड ते गायमुख ते केले मार्गे किंवा दानेवाडी, वाघबीळ मार्गे मार्गस्थ व्हावे. १ तारखेला दुपारी ४ वाजल्यापासून केर्ली फाटा व गिरोली गावचा टी पॉइंट रस्ता तसेच इतर कोणत्याही मार्गावरून जोतिबा डोंगरावर जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.

पालखीसाठी भाविकांनी दुपारी ४ पूर्वी डोंगरावर पोहोचावे. केली ते जुने आंब्याचे झाड ते दानेवाडी क्रॉसिंग ते रेस्ट हाऊस ते सेंट्रल प्लाझा ते यमाई टोल नाका ते गिरोली फाटा ते दानेवाडी रस्त्यावरील निलगिरी बाग या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व वाहन पार्किंग करण्यास मनाई आहे. कांनी, दोनवाडी फाटा मार्गे माले फाटा/वाघबीळ मार्गे सोयीनुसार मार्गस्थ व्हायचे आहे.

वाहन पार्किंग- सासन काठी राखीव, सेंट्रल प्लाझा येथे ट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रॅक्टर व इतर मोठी वाहने- गिरोली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी : यमाई वळणावर, डावी-उजवी बाजू, बुने कॉर्नर, श्रावणी हॉटेलमागे, केएमटी स्टॉपच्या बाजूला, निलगिरी बाग, दोनवाडी फाटा व बुणे.- केर्ली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी : जुने एसटी स्टॅन्डसमोर, पिराचा कडा, तोरणाई कडा, नवीन एसटी स्टॅन्डच्या पाठीमागे, जुने आंब्याचे झाड, गायमुख इनाम पार्किंग.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Jotiba Yatra 2026: Heavy Vehicles Banned from Jotiba Hill

Web Summary : Heavy vehicles are banned from Jotiba hill starting March 30 for the Chaitra Yatra. Restrictions include trucks, rickshaws, and trailers. Two-wheeler restrictions begin April 1. Alternate routes and parking areas are designated for devotees; follow guidelines.