लिंगनूर येथे भररस्त्यातच अडकताहेत अवजड वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:30+5:302021-07-19T04:16:30+5:30
त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावरून याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर ठेकेदार कंपनीने या रस्त्यावर मुरूम ...

लिंगनूर येथे भररस्त्यातच अडकताहेत अवजड वाहने
त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सोशल मीडियावरून याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर ठेकेदार कंपनीने या रस्त्यावर मुरूम टाकला परंतु, हा मुरूम पूर्णतः माती मिश्रित असल्याने पुन्हा या ठिकाणी दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरात लिंगनूर ग्रामस्थांनी आंदोलने, अधिकाऱ्यांना, ग्रामविकास मंत्र्यांना घेराव घातले. मात्र, प्रशासनावर याचा तसूभरही परिणाम झालाच नाही, हे आश्चर्यच आहे.
कोट...
‘‘लिंगनूर-मुरगुड रस्ता वगळता तालुक्यातील रस्त्यासह गावांचा कायापालट करण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे अग्रेसर आहेत. मात्र, दोन राज्यांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याबाबत जनआंदोलने होऊनही एक संवेदनशील मंत्री शांत कसे, हा प्रश्न आहे. त्यांनी मनावर घेतले तर हा रस्ताही टकाटक करू शकतात. काँ. संभाजी यादव
माजी उपसरपंच, लिंगनूर
कॅप्शन
लिंगनूर-मुरगुड भर रस्त्यातच अडकलेले वाहन जेसीबीच्या साहाय्याने काढताना.