राधानगरी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:56+5:302021-09-14T04:28:56+5:30
जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर दीर्घ काळ विश्रांती घेऊन पावसाने आठ दिवसांपूर्वी पुन्हा हजेरी लावली. यामुळे धोक्यात आलेल्या ...

राधानगरी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ
जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर दीर्घ काळ विश्रांती घेऊन पावसाने आठ दिवसांपूर्वी पुन्हा हजेरी लावली. यामुळे धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळाले. मात्र पावसाचा जोर प्रमाणाबाहेर वाढल्याने पोसवण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. पावसासोबत जोरदार वारे असल्याने ऊस व केळी पिकांचे नुकसान झाले आहे.
राधानगरी-गुडाळवाडी मार्गावर दरडी कोसळल्याने बंद झालेला मार्ग आणखी दोन दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवून मार्ग मोकळा केला आहे. मात्र इथे वारंवार दगड व दरडी कोसळत आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
फोटो