पन्हाळा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:30+5:302021-06-18T04:17:30+5:30

पन्हाळा : तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या, नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कुंभी, कासारी नद्या दुथडी ...

Heavy rains in Panhala taluka | पन्हाळा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

पन्हाळा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

पन्हाळा : तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या, नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कुंभी, कासारी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पन्हाळा तालुक्यात माॅन्सून पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे खरिपच्या झालेल्या पेरण्यांची उगवण चांगली झाली रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर दलदल निर्माण झाली. सुरुवातीच्या पावसाच्या दणक्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत पावसाची नोंद पन्हाळा ११०, वाडी, रत्नागिरी ९५, कोडोली ९४, कळे १२९, पडळ १०६, बाजारभोगाव १४०, कोतोली १३२ मिमि पावसाची नोंद झाली कोणत्याही नुकसानीची नोंद तालुक्यात झालेली नाही.

Web Title: Heavy rains in Panhala taluka