कोल्हापुरात पावसाचा जोर; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:35+5:302021-07-14T04:29:35+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर काहीसा राहिला आहे. गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असून चोवीस तासात ११०.८ मिलिमीटर ...

Heavy rains in Kolhapur; Rising water levels in rivers | कोल्हापुरात पावसाचा जोर; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापुरात पावसाचा जोर; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर काहीसा राहिला आहे. गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असून चोवीस तासात ११०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. शिवारात पाणी झाल्याने खोळंबलेल्या रोप लागणीला आता गती आली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे.

-----------------------------------------------

सांगली शहरासह जिल्ह्यात सोमवारी सगळीकडे पाऊस पडला. पावसाचा जोर कमी होता.

-----------------------------------------------

साताऱ्यात सोसाट्याचा वारा अन् पावसाच्या सरी

सातारा : साताऱ्यासह परिसरात सोमवारी सकाळपासून सोसाट्याचा वारा वाहत असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट जाणवत होता.

-----------------------------------------------

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सगळीकडे पाऊस सुरू आहे.

-----------------------------------------------

खारेपाटण येथे पूरजन्य परिस्थिती; शुक नदीने ओलांडली धोक्याची पातळी

खारेपाटण (जि.सिंधुदुर्ग) : गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीला पूर आल्याने तर सह्याद्री खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून यामुळे खारेपाटण गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Heavy rains in Kolhapur; Rising water levels in rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.