शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; शिवारात, झोपडीत पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 11:49 IST

जिल्ह्यात काल बुधवार पासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरुच होती.

कोल्हापूर : जिल्ह्यात काल बुधवार पासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरुच होती. तर आज, गुरुवारी सकाळी पावसाचा जोर वाढला होता. यामुळे नागरिकांची ताराबंळ उडाली. या अवकाळी पावसामुळे मात्र शेतकरी चिंतेत आहे. शिवारातील कामे खोळंबली आहेत. ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे भाजीपाल्यासह रबीलाही तडाका बसणार आहे.अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. रस्ते जलमय झाले आहेत तर शिवारात पाणीच पाणी झाले आहे. यातच साखर कारखान्याचा हंगाम सुरु सुरु असल्याने ऊस तोड मजूर कारखानास्थळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या झोपडीत पाणीच पाणी झाल्याने त्यांचे हाल झाले. अनेक मजूरांनी रात्र जागून काढली.  सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर दहानंतर पुन्हा ऊन पडले होते. यामुळे वातावरणात ऊन-पावसाचा खेळ सुरु असल्याचे चित्र होते. वातावरणातील या बदलाचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे आजारपणात वाढ झाल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोनाचे सावट तर दुसरीकडे या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.गेली तीन-चार दिवस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात बदल झाला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मराठवाडा आणि कोकण भागासह अनेक ठिकाणी 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने 'जेवाद' चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. हे वादळ 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकणार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस