कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. धरणातील विसर्ग कायम असल्याने नद्यांची पातळी स्थिर राहिली आहे. राधानगरीधरण क्षेत्रात पाऊस सुरुच असून काल,बुधवारी रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी धरणाचा ३ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. अद्याप २२ बंधारे पाण्याखाली आहेत.बुधवारपासून पाऊस जोर पकडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, सकाळपासून उघडझाप राहिली. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली. राधानगरी, गडहिंग्लज, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस राहिला.गणेशाच्या आगमनादिवशी पावसाची उघडझाप राहिल्याने काहीसा उत्साह दिसत होता. सकाळच्या टप्प्यातील पावसाच्या सरी वगळता कोल्हापूर शहरात दिवसभर उघडीप राहिली. जिल्ह्यातील ६ इतर जिल्हामार्ग, तर १७ ग्रामीण अशा २३ मार्गांवर अद्यापही पाणी आहे. १७ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ४ लाख ५२ हजारांचे नुकसान झाले आहे.
पाटगाव, कोदे धरणक्षेत्रात धुवाधारबुधवारी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत धरणक्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस राहिला; पण पाटगाव, कोदे धरणक्षेत्रात १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडलाराधानगरी धरण क्षेत्रात पाऊस सुरुच असून रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी धरणाचा ३ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला गेला. या दरवाजातून १४२८ क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे तर पॉवर हाऊसमधून १५०० क्युसेक्स असा एकूण २९२८ इतका विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
‘अलमट्टी’चा विसर्ग दीड लाखावरपाऊस कमी असला तरी अलमट्टी धरणातील विसर्ग कायम आहे. बुधवारी प्रतिसेकंद १ लाख ५० हजार घनफूट, तर हिप्परगी धरणातून ९१ हजार ८९३ घनफूट विसर्ग पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1360702765398791/}}}}