कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे. मात्र त्याला अपेक्षित ताकद लागत नाही. पडेल तिथेच जोरदार कोसळत असून उर्वरित ठिकाणी उघडझाप राहिली. गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस असून ३०.४ मिली मीटर पाऊस झाला. शाहूवाडी तालुक्यात तुलनेत पाऊस कमी आहे.दहा-बारा दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर शुक्रवार पासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. शुक्रवारी दिवसभरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी सकाळ पासून ढगाळ वातावरण राहिले, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. दुपारी कोल्हापूर शहरासह काही तालुक्यात चांगला पाऊस झाला. सुमारे अर्धा तास एक सारखा पाऊस राहिल्याने पाणीच पाणी केले.या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून डोंगरमाथा व माळरानावरील पिकांना एक प्रकारचे जीवदान मिळाले आहे. धरणक्षेत्रातही कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. कासारी, कुंभी, पाटगाव व कोदे या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे.चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊसहातकणंगले- ८.३, शिरोळ -११.७, पन्हाळा -४.२, शाहूवाडी - १, राधानगरी - ३.१, गगनबावडा -३०.४, करवीर - ७.१, कागल- ७.१, गडहिंग्लज - ६.८, भुदरगड - ७.६, आजरा - ३.५, चंदगड - ४.२.
गगनबावड्यात जोरदार पाऊस, उर्वरित जिल्ह्यात उघडझाप : खरीप पिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 17:06 IST
Rain Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे. मात्र त्याला अपेक्षित ताकद लागत नाही. पडेल तिथेच जोरदार कोसळत असून उर्वरित ठिकाणी उघडझाप राहिली. गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस असून ३०.४ मिली मीटर पाऊस झाला. शाहूवाडी तालुक्यात तुलनेत पाऊस कमी आहे.
गगनबावड्यात जोरदार पाऊस, उर्वरित जिल्ह्यात उघडझाप : खरीप पिकांना दिलासा
ठळक मुद्देगगनबावड्यात जोरदार पाऊसउर्वरित जिल्ह्यात उघडझाप : खरीप पिकांना दिलासा