आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:38+5:302021-07-22T04:16:38+5:30
आजरा : आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात १०३ मिलिमीटर पावसाची ...

आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच
आजरा : आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धनगरवाडी व एरंडोळ धरण यापूर्वीच भरले असून धनगरवाडीतून ७५ क्यूसेकने तर, एरंडोळमधून ६० क्यूसेक्सने पाणी सांडव्यातून नदीपात्रात येत आहे.
चित्री धरण ७२ टक्के भरले असून दररोज चित्री धरणात ५० द.ल.घ.फू. पाणीसाठा होत. आंबेओहोळ धरणात ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे.
संततधार पडणाऱ्या पावसाने भात रोप लावणीच्या कामाला वेग आला आहे. पडणारा पाऊस हा सर्वच पिकांना उपयुक्त ठरणारा आहे. पावसाने अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्त्यांचा पंचनामा केला आहे. आजऱ्यातील सर्वच रस्ते गटारीच्या बांधकामामुळे चिखलमय झाले आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसाने हिरण्यकेशी व चित्रा नद्या धोक्याच्या पातळीबाहेरून वाहत आहेत.