जोरदार वळीव पावसामुळे बावड्याचा टोल नाका जमीनदोस्त; दोघे किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 22:49 IST2020-04-16T22:49:11+5:302020-04-16T22:49:34+5:30
एक चार चाकी व आठ मोटरसायकलींची नुकसान

जोरदार वळीव पावसामुळे बावड्याचा टोल नाका जमीनदोस्त; दोघे किरकोळ जखमी
कसबा बावडा - वीजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह आज रात्री पावणेनऊच्या सुमारास कसबा बावड्यात गारांसह मुसळधार झालेल्या पावसामुळे बावडा -एमआयडीसी रस्त्यावरील शिये टोल नाक्याचे संपूर्ण छत कोसळले. त्यात एक चारचाकी, आठ दुचाकी मोटारींचे नुकसान झाले. तर एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
बावड्यातील या टोल नाक्याचे शेड पूर्णपणे खराब झाले होते. ते केंव्हा कोसळेल याचा नेम नव्हता. तरीही महापालिकेने ही शेड उतरवून घेतली नव्हती. आज रात्री पावणे नऊच्या सुमारास जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे हा टोलनाका जमीनदोस्त झाला. त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार चाकीचे व आठ मोटरसायकलचे नुकसान झाले. या टोल नाक्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तासाठी होते.