शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कमी कालावधीत प्रचंड पाऊस हे महापुराचे प्रमुख कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:36 IST

कोल्हापूर : महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर , सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांत सरासरी ६५ टक्क्यांहून अधिक झालेला पाऊस हेच ...

ठळक मुद्देकमी कालावधीत प्रचंड पाऊस हे महापुराचे प्रमुख कारण‘जलसंपदा’कडून आकडेवारीचा काथ्याकूट, अन्य कारणांचाही शोध

कोल्हापूर : महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांत सरासरी ६५ टक्क्यांहून अधिक झालेला पाऊस हेच मुख्य कारण असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. याबाबत कोणीही अधिकारी अधिकृत भूमिका मांडत नसले तरी गेले १५ दिवस या विभागाचे अधिकारी केवळ पावसाची आकडेवारी आणि धरणांचा विसर्ग यांमध्येच अडकले आहेत. सातत्याने मंत्रालयातून याबाबतच्या कारणांबाबत पाठपुरावा होत असल्याने रोज नवनवीन आकडेवारी पाठविण्यामध्ये हा विभाग गुंतला आहे.जुलैमध्ये पावसाने पाठ फिरविल्यानंतर आॅगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला. जुलैअखेर सुरू झालेल्या पावसाने ३ आॅगस्टनंतर रौद्र रूप धारण केले. एकाच वेळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस सुरू झाल्याने धरणे भरण्याचा वेग वाढला. अखेर पुराची भीती दिसत असतानाही शासकीय नियमांप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.याआधी २००५ साली जो पूर आला होता, त्याच्या पाच दिवसांमध्ये जेवढा पाऊस झाला, त्या वेळेपेक्षा ६५ टक्के जादा पाऊस यावेळच्या महापुरावेळी झाला. जरी या तीनही जिल्ह्यांत हा पाऊस एकाच वेळी झाला नसता तर महापुराची तीव्रता कमी झाली असती. मात्र तीनही जिल्ह्यांत एकाच वेळी अकल्पित असा प्रचंड पाऊस झाल्याने जलसंपदा विभागाचे हात बांधले गेले.३२५ टीएमसी पाणी गेले वाहूनया महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील सर्व धरणांमधून तब्बल ३२५ टीएमसी पाणी खाली सोडले गेले. धरणांच्या सुरक्षिततेसाठी हे पाणी सोडणे गरजेचे बनले आणि त्यामुळेच महापुराची तीव्रता वाढली. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या लहान-मोठ्या ६६ जलप्रकल्पांमध्ये दरवर्षी ९० टीएमसी पाणीसाठा केला जातो. मात्र गेल्या आठवड्यात पुराच्या काळात या ६६ जलप्रकल्पांमधून एकूण २०० टीएमसी पाणी खाली सोडावे लागले आहे. त्याबरोबरच अलमट्टीची फुग, कोल्हापूर, सांगली शहरांत झालेली पूरस्थितीतील बांधकामे अशा अनेक कारणांमुळे ही तीव्रता वाढल्याची चर्चा जलसंपदा विभागात आहे.मंत्रालयातून सातत्याने माहितीची मागणीपूर सुरू झाल्यापासून रोज मंत्रालयातून पडणारा पाऊस, गेल्या काही वर्षांमधील सरासरी, गेल्या काही वर्षांमधील धरणांतील पाण्याचा विसर्ग, २००५ च्या पुराची स्थिती, तेव्हाचा पाऊस, तेव्हाचा धरणांतील विसर्ग ही माहिती सातत्याने मागविली जात आहे. त्यामुळे गेले १५ दिवस या विभागाचे अधिकारी याच कामात आहेत. आता पुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समितीची स्थापना झाल्याने लवकरच या समितीचा दौराही होण्याची शक्यता आहे. 

 

 

टॅग्स :Rainपाऊसzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर