शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला; पुराची पातळी घसरली; अद्याप ६३ मार्ग बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 11:58 IST

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल, रविवार पासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरणातील विसर्गही कमी झाल्याने पुराच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळी कमी झाली असून, कोल्हापूर शहरात घुसलेले पाणीही कमी होऊ लागले आहे. अद्याप पूरस्थिती कायम असली, तरी पाऊस कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली, तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असून, त्यातून प्रतिसेकंद ४,३५६ घनफूट पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होताना दिसत आहे. दिवसभरात पंचगंगेची पातळी फुटाने कमी झाली असून, १२ बंधारे पाण्याखालून मोकळे झाले आहेत.सोमवारसाठी ‘ग्रीन’ अलर्टहवामान विभागाने रविवारी ‘येलो’ अलर्ट दिला होता. त्यानुसारच पावसाची उघडझाप सुरू होती. सोमवारसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘ग्रीन’ अलर्ट दिला असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.कोल्हापूरकरांच्या पाणी पातळीकडे नजरापंचगंगेची पाणी पातळी जसजशी वाढत गेली, तसतशी कोल्हापूरकरांची धाकधूक वाढत होती. रविवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी दिवसभर पुराच्या पाणी पातळीकडे कोल्हापूरकरांच्या नजरा होत्या.पडझडीत १.३४ कोटींचे नुकसानजिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ३ सार्वजनिक, तर ४५५ खासगी अशा ४५८ मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये तब्बल १ कोटी ३४ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

एसटीचे ४८ मार्ग बंदमहापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने रविवारी एसटीचे ४८ मार्ग बंद राहिले. चंदगड, गडहिंग्लज व इचलकरंजी आगारातील एसटी बसचे मार्ग सर्वाधिक बंद आहेत.

  • पंचगंगेच्या पातळीत घसरण 
  • सध्याची पातळी : ४६.२ फूट
  • बंधारे पाण्याखाली : ८३
  • मार्ग बंद : ६३
  • नुकसान : ४५८ मालमत्ता
  • नुकसानीची रक्कम : १ कोटी ३४ लाख ४९ हजार
  • कोल्हापूर ते गारगोटी : मडिलगे येथील पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू
  • पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर