भुदरगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST2021-05-17T04:23:04+5:302021-05-17T04:23:04+5:30
शनिवारी रात्री तुरळक पावसाला सुरुवात झाली. पहाटे जोरदार वारे वाहत होते. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या, तर दुपारपासून ...

भुदरगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
शनिवारी रात्री तुरळक पावसाला सुरुवात झाली. पहाटे जोरदार वारे वाहत होते. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या, तर दुपारपासून जोरदार पाऊस सुरू झाला. वाऱ्याच्या झडीमुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. विजेचा लपंडाव सुरू होता. कडक लॉकडाऊन असल्याने लोक घरी बसून आहेत. सगळ्या तालुक्यात शुकशुकाट पसरलेला आहे. भुदरगड पोलिसांनी सकाळपासूनच अकारण फिरणाऱ्या त्रेचाळीस वाहनधारकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केल्याची खबर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मुख्य रस्त्यासह गारगोटी शहरात रस्ते निर्मनुष्य होते.
पेरणीपूर्व मशागत आणि उसाला या पावसामुळे फायदा होणार आहे.