आजऱ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST2021-05-17T04:23:02+5:302021-05-17T04:23:02+5:30
आजरा : आजरा तालुक्यात मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. वाऱ्याने आवंडी वसाहतीमधील झाडे तारांवर पडल्यामुळे विद्युत पुरवठा ...

आजऱ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
आजरा :
आजरा तालुक्यात मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. वाऱ्याने आवंडी वसाहतीमधील झाडे तारांवर पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तालुक्यात अनेक गावांमध्ये झाडाच्या फांद्या घरावर पडल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे.
आजरा नेसरी मार्गावर किणेजवळ रस्त्यावर झाडे पडल्याने तब्बल चार ते पाच तास वाहतूक खोळंबली होती. शहरातही झाडाच्या फांद्या घरावर पडल्याने किरकोळ नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे व कौले उडाली.
वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसाने शहरातील गटारीचे पाणी रस्त्यावर आले. पावसाने शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे. उन्हाळी भुईमूग, मका या पिकांचे पावसाने नुकसान झाले आहे तर वीट व्यावसायिकांचेही आजच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आवंडी वसाहतीमध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने वीज वितरणच्या तारांवर झाडे उन्मळून पडली. दिवसभर कर्मचारी झाडे हटवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करीत होते. सायंकाळी उशिरा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.