शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वरुणराजाने अकरा दिवसांनंतर जोतिबा यात्रेतील गुलाल धुतला, उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:46 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून पहिल्यांदाच मोठा वळीव कोसळल्याने पिकांनाही पोषक ठरणार आहे.मंगळवारी सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. कमाल तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहचल्याने दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यात किमान तापमान २५ डिग्रीपर्यंत राहिल्याने उष्म्यात वाढ झाली. दुपारी रस्त्यावरून जाताना गरम वाफा अंगाला भाजत होत्या. दुपारनंतर कोल्हापूर शहरात पावसाचे वातावरण झाले, रात्री आठ वाजता सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली.त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटाने मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. कानठळ्या बसवणारा विजेचा आवाज होता. सुमारे अर्धा तास पावसाने शहरासह परिसराला झोडपून काढले.दरम्यान, आज, बुधवारी तापमान कायम राहणार असले तरी पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणीअर्धा तास एक सारखा पाऊस कोसळत राहिल्याने कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. गटर्स तुडुंब भरून वाहू लागल्याने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी पसरले होते.अकरा दिवसांनंतर गुलाल धुतलादख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर हमखास पाऊस येतो. यात्रेत उधळलेला गुलाल पाऊस धुऊन काढतो. यंदा १२ एप्रिलला चैत्र यात्रा पार पडली. त्यानंतर भाविकांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर अकरा दिवसांनी गुलाल धुण्यासाठी वरुणराजा आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसJyotiba Templeजोतिबा