शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; ‘पंचगंगा’ पुन्हा पात्राबाहेर, ५० बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:40 IST

दिवसात दहा इंच पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर : शहर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर ऊन, पाऊस असे चित्र राहिले. सकाळच्या टप्प्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. दुपारी अडीच, तीनच्या सुमारास ऊन होते. सर्वत्र धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने पंचगंगा नदीतीलपाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडले. पाण्याची वाढ इशारा पातळीच्या दिशेने सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे, नदीतीलपाणीपातळी वाढली आहे. एकूण ५० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधाऱ्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तळकोकण, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धो, धो पाऊस कोसळत आहे. यामुळे चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आजरा तालुक्यातील आंबेओहोळ, सर्फनाला, गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धामणीचे धरण नव्वद टक्के भरले आहे. सर्वच मोठी, मध्यम, लघू धरणे पन्नास टक्क्यांवर भरली आहेत.कोयना धरणात ५८.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. ३३ हजार २८६, तर जावक १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आलमट्टी धरणात ८८.१२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ९३ हजार ९६३ क्सुसेक आवक, तर एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे.

धामणी नदीपात्रात पाणीपातळी वाढणारधामणी धरण ९० टक्के भरले आहे. गुरुवारी रात्री किंवा आज, शुक्रवारी सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे धामणी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, धरण क्षेत्रात पर्यटनास येऊ नये, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनाने केले आहे.

वारणा धरणातून विसर्ग वाढवला..वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. परिणामी धरणातील पाणीपातळी सांडवा पातळीवर आली आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून येत्या चोवीस तासांत वक्र दरवाजातून २८४० क्युसेकपर्यंत आणि विद्युतगृहास १६६० क्युसेक असा एकूण ४५०० क्युसेकपर्यंत पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती वारणा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता बी. आर. पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली.

दिवसात दहा इंच पाणीपातळीत वाढपंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर गुरुवारी पहाटे चार वाजता ३१.४ इंच पाणीपातळी होती. सायंकाळी पाच वाजता ३१.११ इंच पाणीपातळी राहिली. इशारा पातळी ३९ फुटांवर आहे. त्या दिशेने पुन्हा एकदा पाणी वाढत आहे.