शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही वळीव पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 11:40 IST

कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. काही ठिकाणी झोडपून काढले तर काही ठिकाणी हलकासा शिडकाव ...

कोल्हापूर: सलग तिसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. काही ठिकाणी झोडपून काढले तर काही ठिकाणी हलकासा शिडकाव झाला.कोडोली परिसराला सोमवारी रात्री जोरदार पावसाने चांगलेच झोडपून काढले. दिवसभर कडाक्याचे ऊन होते तर साडेपाचपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला यावेळी विजेच्या कडकडाट होताच मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱ्या वरुणराजाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. गडहिंग्लज शहरासह परिसरात पाऊसगडहिंग्लज : वळीव पावसाने गडहिंग्लज शहरासह नेसरी, महागाव, हलकर्णी, नूल आणि कडगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यात तिसऱ्या दिवशीही वळीव पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. दिवसभरातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. परंतु, पावसामुळे काहीकाळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. भाजीपाला, ऊस आणि उन्हाळी पिकांसह शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे.राधानगरी परिसरात पावसाची हजेरीराधानगरी : परिसरात सोमवारी रात्री ८:३० च्या दरम्यान वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडला. यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला. सोमवार सायंकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. राधानगरी धरण परिसर शिरोली, तारळे, पिरळ, फेजिवडेसह तालुक्यातील अनेक गावांत पाऊस झाला.वाघापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊसवाघापूर : वाघापूर तसेच परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. आज दुपारपासून उष्मा वाढल्याने पावसाचे आगमन झाले. सोसाट्याच्या वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने काही घरांची कौले उडून गेली, तर काही झाडे घरावर पडून नुकसान झाले आहे. ऊस पिकासाठी पाऊस समाधानकारक झाला असला तरी भुईमूग, तीळ काढणीची कामे थांबली आहेत. कडाक्याची वीज, पाऊस यामुळे सतत विजेचा लपंडाव सुरू आहे.किणीसह परिसरात पाऊसकिणी : किणीसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गेले काही दिवस वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असताना सोमवारी सायंकाळी ७ वाजता जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस