शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरीत जोरदार पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग वाढला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:25 IST

उद्यापासून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनाबवडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड, आजरा तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस होता. धरणक्षेत्रातहीपाऊस वाढल्याने राधानगरीचा तिसऱ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा खुला झाला आहे. यातून प्रतिसेकंद २९२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पाऊस वाढला असला तरी पाण्याचा निचरा वेगाने होत असल्याने नद्यांची पातळी २१ ते २२ फुटांपर्यंत स्थिर राहिली आहे. उद्या, बुधवारपासून दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, या कालावधीत विशेषत: घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. रविवारी तुलनेत कमी पाऊस होता. पण, मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा जाेर पकडला आहे. सोमवारी सकाळी तर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात जरा जोर अधिक होता. दुपारनंतर कोल्हापूर शहरासह पूर्वेकडील तालुक्यात जोर वाढला. थांबून थांबून जोरदार सरी कोसळत होत्या.पाऊस वाढला असला तरी नद्यांची पातळी मात्र स्थिर दिसत आहे. सोमवारी सकाळी पंचगंगा नदीची पातळी २२.३ फुटांवर होती. मात्र, सायंकाळ पाच वाजात ती २१.४ फुटांपर्यंत खाली आली. अलमट्टी व हिप्परगी धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याचा निचरा झपाट्याने होत आहे. अद्याप वीस बंधारे पाण्याखाली असून, दहा मार्ग पाण्यामुळे बंद आहेत.दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ३३.३ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. या कालावधीत जिल्ह्यातील ४ खासगी मालमत्तांची पडझड होऊन २ लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे.

असा आहे धरणातून विसर्ग..धरण - विसर्ग प्रतिसेंकद घनफूट

  • राधानगरी - २९२८
  • वारणा - १६३०
  • दूधगंगा - ४६००
  • घटप्रभा - २२४१
  • धामणी - ३३५६