इचलकरंजीत दोन गटांत जोरदार हाणामारी
By Admin | Updated: March 7, 2015 01:03 IST2015-03-07T00:45:12+5:302015-03-07T01:03:51+5:30
परस्परविरोधी तक्रारी दाखल : दोन्ही गटातील बाराजणांना अटक

इचलकरंजीत दोन गटांत जोरदार हाणामारी
इचलकरंजी : होलिकोत्सवानिमित्त उत्तर भारतीय कामगारांची रंगपंचमी, तर महाराष्ट्रीयन तरुणांची धुलवडीची पार्टी यादरम्यान पाणी देण्याच्या कारणावरून दोन्ही तरुणांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. एका यंत्रमाग कारखान्यासमोर शुक्रवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणाची मिटवामिटवी सुरू असल्याने दिवसभर शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर सुमारे दीडशे तरुणांचा जमाव घुटमळत होता. मात्र, तडजोड न झाल्याने रात्री उशिरा परस्परविरोधी तक्रारी पोलिसांत नोंद झाल्या.
योगेश गारवे (२३, रा. योगायोगनगर) याने दिलेल्या तक्रारीत शिवाजीकुमार बिन व इतर आठ ते दहा कामगारांनी आपल्यासह मित्रांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. छोटूकुमार अंतू बिन (वय १९) याने दिलेल्या तक्रारीत योगेश गारवे याच्यासह पाचजणांनी लाथाबुक्क्यांनी व ट्युबलाईटच्या लोखंडी पट्टीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करून दोन्ही गटातील बाराजणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सुभाष बिन, रामेश्वरप्रसाद बिन, धरभरण बिन, पिंटूकुमार बिन, रामप्रसाद बिन, छोटूकुमार बिन, पिंटकुमार बिंद (सर्व रा. उत्तर प्रदेश) आणि देवधन सासणे व योगेश गाडवे (दोघे रा. कलानगर परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.