इच्छुकांच्या भाऊगर्दीचा नेत्यांना ताप

By Admin | Updated: August 2, 2015 23:50 IST2015-08-02T23:50:19+5:302015-08-02T23:50:19+5:30

महापालिकेचे पडघम : अशोक जाधव यांची उमेदवारी अनेकांची डोकेदुखी ठरणार...!

Heating the relatives of the interested brothers | इच्छुकांच्या भाऊगर्दीचा नेत्यांना ताप

इच्छुकांच्या भाऊगर्दीचा नेत्यांना ताप

रमेश पाटील - कसबा बावडा -‘कसबा बावडा राजर्षी शाहू मराठी शाळा’ या नावाने प्रभाग क्र. २ ला गेल्या निवडणुकीत ओळखले जात होते. आता नव्याने झालेल्या प्रभाग रचनेत त्याचे नाव ‘कसबा बावडा पूर्व बाजू’ असे झाले आहे. २०१० च्या निवडणुकीत इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) आरक्षण झालेला हा प्रभाग आता खुला प्रवर्ग (पुरुष) झाला आहे. परिणामी, या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या डझनाच्या पुढे गेली आहे. या प्रभागातून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या निवासस्थानी इच्छुक गर्दी करत आहेत.
या प्रभागात आमदार महादेवराव महाडिक गटाचा उमेदवार असणार हे जवळपास नक्की आहे. विद्यमान नगरसेवक प्रदीप उलपे यांनी या प्रभागातून उमेदवारी मिळावी म्हणून सतेज पाटील यांच्याकडे जोरदार प्रयत्न चालू ठेवले आहेत. माजी नगरसेवक अशोक जाधव यांनीही आपण दहा वर्षे या प्रभागाचे नेतृत्व केले असल्याने आपण रिंगणात उतरत असल्याचे जाहीर केले आहे. अशोक जाधव यांच्या उमेदवारीमुळे अनेकांची डोकेदुखी वाढणार आहे.
‘कसबा बावडा पूर्व बाजू’ या प्रभागात ठोंबरे मळा, माळी गल्ली ते बडबडे मळा, यशवंत कॉलनी, मर्दाने कॉलनी, कदमवाडी रस्ता, निरंजे पाणंद, श्रीराम पेट्रोल पंप, शाहू नगरी, महाराष्ट्र गॅरेज, भगतसिंग वसाहत, जामदार मळा या भागाचा समावेश आहे. प्रभाग रचना बदलल्यामुळे या प्रभागातील पूर्वीची चौगले गल्ली पूर्व, रणदिवे गल्ली पूर्व, ठोंबरे गल्ली पूर्व, अतिग्रे गल्ली, धनगर गल्ली, वेटाळे गल्ली, चव्हाण गल्ली पूर्व बाजू यांना वगळण्यात आले आहे; तर शाहू कॉलनी, दत्त कॉलनी, नेजदार चाळ, अयोध्या कॉलनी, जयहिंद पार्क, अभिजित रेसिडेन्सी, पाडळकर कॉलनी, निवारा कॉलनी, मधुमती कॉलनी, जमदर्गी मळा, अष्टविनायक कॉलनी आणि दगडी चाळीतील काही भागाचा या प्रभागात नव्याने समावेश करण्यात आला आहे.
या प्रभागाच्या रचनेतही बदल झाला आहे. प्रभागाच्या उत्तर बाजूकडील माउली वॉटर सप्लायर ते पंचगंगा नदी पूल व टोलनाका, पूर्व बाजूचा नदी व शेतीचा परिसर, दक्षिणेकडील गणेश मंदिर ते जामदार टॉवर, जामदार शेड, बावडा प्लांट व देवार्डे मळा, तर पश्चिम बाजूकडील कसबा बावडा मेन रोड, दगडी चाळ, अष्टविनायक कॉलनी, बावडा पॅव्हेलियन, ग्राऊंड ते भगतसिंग वसाहत, शाहू कॉलनी अशा रचनेत प्रभाग विभागला आहे.
या प्रभागावर विद्यमान नगरसेवक प्रदीप उलपे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अशोक जाधव यांचे वर्चस्व आहे. प्रदीप उलपे यांचा शुगरमिल प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने उलपे यांनी प्रभाग क्र. २ मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मूळ प्रभाग क्र. १ मधील निम्म्याहून अधिक भाग क्र. २ मध्ये आल्याने व आपले हक्काचे दीड हजार मतदार याच प्रभागात येत असल्याने त्यांनी आपणास उमेदवारी मिळावी म्हणून सतेज पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. निवास चौगले, नाना उलपे, पवन साळोखे, यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. प्रदीप उलपे यांनी या भागात मोठी कामे केल्याचे सतेज पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. प्रत्येकजण आपली दावेदारी जोरदारपणे मांडत आहेत.
या प्रभागातून माजी नगरसेवक व राजाराम कारखान्याचे संचालक हरीष चौगले यांचे चिरंजीव सचिन चौगले हे महाडिक गटाची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. प्रभाग क्र. २ प्रमाणे प्रभाग क्र. ४ मधूनही त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे.
या प्रभागातून माजी नगरसेवक अशोक जाधव (सर) निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक कोणत्या गटाकडून लढवायची, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असा त्यांचा बोलण्याचा सूर आहे. सन २००० ते २०१० अशी सलग दहा वर्षे या प्रभागाचे आपण नेतृत्व केले आहे. त्यामुळे लोक मला मानतात. आता जनतेच्या कामासाठी मी पुन्हा निवडणूक रिंगणात असल्याचे ते बोलतात. अशोक जाधव यांच्या उमेदवारीने मात्र अनेकांची दमछाक होणार आहे. कारण या प्रभागात अशोक जाधव यांना मानणारा मोठा मतदार आहे.
या प्रभागातून अ‍ॅड. नीलेश नरुटे, वृत्तपत्र विक्रेते शंकर चेचर, सुभाष जाधव, धीरज पाटील, श्रावण संभाजी फडतारे, तसेच शिवसेनेकडून रवी माने, आदी इच्छुक निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. श्रावण फडतारे यांनी मोठ्या संख्येने लोकांना बरोबर घेऊन सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. उमेदवारींची वाढलेली संख्या नेत्यांना उमेदवारी देताना तापदायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत.


उमेदवारी कोणाला?
कसबा बावडा पूर्व उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विद्यमान नगरसेवक प्रदीप उलपे यांनी, हा आपलाच पूर्वीचा मतदारसंघ असून, आपले हक्काचे मतदार याच मतदारसंघात आहेत. त्यामुळे आपणास उमेदवारी मिळावी, अशी मागणी सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. या प्रभागातून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने सतेज पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.

असा आहे प्रभाग
ठोंबरे मळा, माळी गल्ली ते बडबडे मळा, यशवंत कॉलनी ते मर्दाने कॉलनी, कदमवाडी रस्ता बिराजे पाणंद, श्रीराम पेट्रोलपंप, शाहूनगरी महाराष्ट्र गॅरेज. भगतसिंग वसाहत, जामदार मळा.

Web Title: Heating the relatives of the interested brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.