शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

‘दादा, मी नदीवर कपडे धुवायला आलेय’; काल ग्रामपंचायत निवडणूक जिंकलेल्या पल्लवीची मनाला भिडणारी गोष्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 18:29 IST

कोणीतरी समस्या सोडवेल या आशेवर राहण्याऐवजी स्वत:च परिवर्तनाच्या शिलेदार म्हणून पल्लवी महिंदकर निवडणूक लढल्या अन् जिंकल्या

- सतिश नांगरे

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसलेला नाही. आम्हीच कशी बाजी मारली, आपली ताकद कशी वाढली, याची गणितं राजकीय पक्षांचे नेते मांडत आहेत. काही गावांमध्ये अजूनही विजयाचं सेलिब्रेशन आणि पराभवाचं चिंतन सुरू आहे. त्याचवेळी, लोकशाहीची एक वेगळी बाजू, एक आगळं रूप कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर वारुण गावात दिसलं.

पल्लवी मोहन महिंदकर या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या. २२ व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरून विजयाची पताका फडकवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अगदीच अनपेक्षित आणि आश्चर्याचा धक्का देणारं होतं. ‘दादा, मी वारणा नदीवर कपडे धुवायला आली आहे’, असं म्हणत त्यांनी हातचं काम थोडं बाजूला ठेवून आपल्या राजकारणातील प्रवेशाची गोष्ट सांगितली.

शित्तूर वारुण हे वारणा खोऱ्यातील डोंगरकपारीत असलेलं गाव. लोकसंख्या साधारण पाच हजार. चांदोली धरणाच्या पायथ्याशी वसलेलं. कुठलाही राजकीय वारसा नसताना या गावातूनच पल्लवी महिंदकर यांनी निवडणूक लढवली. किंबहुना, त्यांना ती लढवावी लागली.

‘दोन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. पती पदवीधर आहेत. पण, गावात नोकरी नसल्याने मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. कोरोना काळात त्यांची नोकरी गेली आणि ते गावी परत आले. तेव्हा, गावातील अनेक प्रश्नांबद्दल, अडचणींबद्दल त्यांच्यासोबत चर्चा व्हायची. गावातले प्रश्न सुटले पाहिजेत. विकास झाला पाहिजे, असं आपण नुसतं म्हणत राहतो. पण कोणीतरी येईल, बदल घडवेल, आपले प्रश्न सोडवेल, यावर माझा विश्वास नव्हता. त्यामुळे आपणच परिवर्तनाचे शिलेदार होवू या, या भावनेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला,' असं पल्लवी यांनी सांगितलं. शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पल्लवी ४६१ मतं घेऊन विजयी झाल्या.पल्लवी यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. जेमतेम शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. फारसं राजकीय, आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नाही. तरुण मुली मोठ्या प्रमाणात राजकारणात आल्या, तर राजकारणाचा आजचा पोत बदलेल, असं पल्लवी यांना वाटतं. परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करावी, या विचारानं पल्लवी यांनी राजकारणात उतरुन निवडणूक लढवली. त्या सांगतात, एका ग्रामपंचायत सदस्याकडून तशा ग्रामस्थांच्या अपेक्षा तरी किती असतात. नियमित पाणी, दैनंदिन स्वच्छता, गटारं, अंतर्गत प्रश्न मार्गी लागावेत हीच ग्रामस्थांची माफक अपेक्षा असते. त्यामुळे या प्रश्नांवर मी भर देईनच. त्याशिवाय गावाच्या हिताच्या आड येणारं कोणतंही काम मी करणार नाही, असं पल्लवी यांनी ठामपणे सांगितलं.ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्वात आधी कोणतं काम कराल असं विचारलं असता, गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेत काही गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवले जावेत यासाठी प्रयत्न करेन, असं उत्तर पल्लवी यांनी दिलं. याशिवाय रोजगारासाठी गावातल्या तरुणांचं होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी, तरुणांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेती उत्पादनाला थेट बाजारपेठ, छोट्या मोठ्या व्यवसायांना बँका, फायनान्स कंपन्या, सहकारी संस्था व पतपेढ्या यांच्या मार्फत कर्ज मिळवून देऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करेन. गावात नोकरी मिळत नसल्यानं आजच्या घडीला प्रत्येक कुटुंबातील एक तरुण मुंबईला स्थलांतरित होत आहेत. त्यांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पल्लवी यांनी सांगितलं. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना