शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत उद्या सुनावणी, पडळकर समर्थकाची गाडी फोडल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 18:51 IST

तहसीलदारांनी वादग्रस्त जागेत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत

मिरज : मिरजेत ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह जमावाने दुकाने पाडल्याप्रकरणी जागेच्या वादाबाबत मिरज तहसीलदारांसमोर सुनावणी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. वादग्रस्त जागेत कोणत्याही बांधकामास तहसीलदारांनी मज्जाव केला. दरम्यान, पडळकर समर्थकाची गाडी फोडल्याप्रकरणी गांधी चौक पोलिसांत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.भाजप आ. गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानकाजवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी सुमारे दीडशे जणांचा जमाव सोबत घेऊन शनिवारी मध्यरात्री चार पोकलॅन लावून दहा दुकाने पाडून एक कोटी रुपयांचे नुकसान केले. याबाबत पडळकर यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या वादग्रस्त जागेबाबत मिरजेचे तहसीलदार दगडू कुंभार यांनी कलम १४५ अन्वये जैसे थे परिस्थिती ठेवून वादग्रस्त जागेत दोन्ही गटांनी काहीही करू नये, असा आदेश दिला आहे. याबाबत सोमवारी तहसीलदार दगडू कुंभार यांच्यासमोर सुनावणी पार पडली.मिळकतधारकांनी संबंधित जागेवर कब्जा असल्याची कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली. यावर तहसीलदार दगडू कुंभार यांनी बुधवारपर्यंत दोन दिवसांनी सुनावणी निश्चित केली.यावेळी ब्रह्मानंद पडळकर गटाचे वकील अनुपस्थित होते. पाडलेली दुकाने पुन्हा बांधण्याची मिळकतधारकांनी परवानगी मागितली. मात्र, तहसीलदारांनी बांधकामास परवानगी नाकारून वादग्रस्त जागेत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले. मिळकतदारांतर्फे ॲड. नितीन माने, ॲड. ए. ए. काझी यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.दरम्यान, वादग्रस्त जागेतील दुकाने पाडताना गाडी फोडल्याप्रकरणी गांधी चाैक पोलिसात बिरा बजभीम शिंगाडे (४८, रा. सांगोला) या पडळकर समर्थकाने फिर्याद दिली आहे. चिंचणी मायाक्का येथून देवदर्शन घेऊन परत येत असताना शनिवारी मध्यरात्री पावणेतीन वाजता मिरजेत अमर थिएटरसमोर आल्यानंतर शकिल, शब्बीर शेख, शाहिद पिरजादे व त्यांच्या पाच साथीदारांचे आपापसांत भांडण सुरू होते.

यावेळी गाडी बाजूला घेत असताना त्यांनी गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या व शिंगाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व हत्याराने वार करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पडळकर गटानेही मिळकतधारकांवर गुन्हा दाखल केल्याने याबाबत आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGopichand Padalkarगोपीचंद पडळकरmiraj-acमिरज