शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नणुंद्रेच्या आरोग्य सेविकेचा एसटी खाली सापडून जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 17:29 IST

शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण येथील घटना : नणुंद्रे गावावर शोककळा

करंजफेण प्रतिनिधी : पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे येथील स्वरूपा विजय शिदें (वय ३०)या प्राथमिक आरोग्य केंद्र करंजफेण ता.शाहुवाडी अंतर्गत येणाऱ्या नांदगाव आरोग्य उपकेंद्रात कामाला होत्या, आज सकाळी १० च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र करंजफेण येथे सावर्डी येथील सोनाली सुरेश कांबळे हिच्या प्रस्तुतीसाठी पुनाळ येथील आरोग्य सेवक हैबती मगदूम यांच्या सोबत जात असताना करंजफेण गावा- जवळच्या धावड्‌याचे शेताजवळ  करंजफेनहून नांदगाव - कोतोली मार्गे कोल्हापूरला जाणारी एस. टी.समोरून आल्याने मोटरसायकल बाजून घेत असताना व रस्ता अरुंद असल्याने साईटपट्या खचल्याने पुढील चाक घसरले व तोल जाऊन हैबती मगदूम व स्वरुपा शिंदें खाली पडले त्याचवेळी एस. टी.गाडी पास होत होती. त्यादरम्यान शिंदे ह्या एस. टी. च्या मागील चाकाखाली सापडल्या व त्यांच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मूत्यू झाला.

दरम्यान जखमी झालेल्या हैबती मगदूम यांना मलकापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील सागर पाटील या एस. टी.चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वरूपा शिंदे यांच्या नविन घराची वास्तुशांती दोन महिन्यापूर्वी झाले होते, नव्या घरात राहण्यासाठी त्या कुटूंबासह राहत होत्या. शिंदें यांना इयत्ता ४ मध्ये शिकणारा मुलगा व अंगणवीडीत शिकणारी मुलगी असून त्यांचे पती विजय शिंदे प्राथमिक शिक्षक आहेत.गौरी गणपतीच्या सणात घडलेल्या अपघाताने नणुंद्रे गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात