शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’, पालखी सोहळ्यात कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे पथक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 15:54 IST

चार जिल्ह्यांतून निघणार वारी

दीपक जाधवकोल्हापूर : आषाढीवारीनिमित्त निघणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या व पालखी सोहळ्यात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाने पुढाकार घेतला असून कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतून जाणाऱ्या दिंडी व पालखी सोहळ्यात आरोग्य पथक तैनात असेल. या पथकाद्वारे वारकऱ्यांना तपासणीसह उपचार पुरविण्यात येणार आहेत.कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतून साधारणपणे साठ ते सत्तर छोट्या मोठ्या पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. त्यांना आरोग्य सुविधा पुरव ण्यासाठी चार जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी याच्या मार्गदर्शनाखाली चारशेहून अधिक कर्मचारी या आरोग्य वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देणार आहेत. वारीमध्ये दुचाकीवरून ३५ आरोग्यदूत फिरते राहणार असून वारीमध्ये चालत असताना वारकऱ्यांना काही अडचणी येऊ नयेत म्हणून हे आरोग्यदूत लक्ष ठेवतील. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तेथील आरोग्य संस्थेतील २६ रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत. या आरोग्यवारीच्या माध्यमातून दिंडी सोहळ्यात सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती ही करण्यात येणार आहे.

पाण्याची तपासणी..दिंडीतील वारकऱ्यांसाठी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही टँकरच्या माध्यमातून केली जाते. या पाण्याची तपासणी ठिकठिकाणी आरोग्य विभागामार्फत होणार आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून यावर्षी प्रथमच आरोग्य विभागामार्फत ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आरोग्य विभागाला मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही अडचण वारकऱ्यांना येऊ देणार नाही. - डाॅ. दिलीप माने आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर.

असे असतील आरोग्य कर्मचारी

  • तज्ञ डाॅक्टर-०२
  • वैद्यकीय अधिकारी -८६
  • आरोग्य अधिकारी -६६
  • आरोग्य निरीक्षक-२६
  • अधिपरिचारिका - १५
  • आरोग्य सेविका ५१
  • आरोग्य सेवक -७६
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ-०५
  • औषध निर्माण अधिकारी ४२
  • वर्ग चारचे कर्मचारी १०
  • वाहन चालक- १३

अशी असेल आरोग्य सुविधा

  • चार जिल्ह्यांतून ४२ पथके.
  • प्रत्येक ५ किलोमीटरवर एक पथक.
  • आरोग्यदूत ३५
टॅग्स :kolhapurकोल्हापूरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022doctorडॉक्टर