कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे ‘आरोग्य चळवळ’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST2021-09-17T04:28:33+5:302021-09-17T04:28:33+5:30
या चळवळीचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत योगासने, ध्यानधारणा, व्यायाम, खेळ यांचे प्रशिक्षण ...

कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे ‘आरोग्य चळवळ’ सुरू
या चळवळीचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत योगासने, ध्यानधारणा, व्यायाम, खेळ यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. कोरोनाच्या काळात मानवी आरोग्य हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे. शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी आरोग्याची चळवळ सुरू केली आहे. त्याचा विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले. शहाजी लॉ कॉलेजमधील बहुउद्देशीय सभागृहाची पायाभरणी आणि बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव ॲड. व्ही. एन. पाटील, संचालक ॲड. वैभव पेडणेकर, आदींच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर संजय मोहिते, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुश कावळे, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. प्रदीप पाटील, बाळासाहेब कुंभार, अनिल घाटगे, डॉ. शरद बनसोडे, आदी उपस्थित होते. दरम्यान, नाइट कॉलेजमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बुलेटिन आणि मराठी विभागाच्या सांजवात या भित्तीपत्रकाचे प्रकाशन आणि समाजाशास्त्र विभागातर्फे आयोजित वृत्तपत्रीय कात्रण प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनासाठी डीआरके कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विलास पाटील, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. नारायणन, नाइट कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश फराकटे यांनी परिश्रम घेतले.
फोटो (१६०९२०२१-कोल-रत्नाप्पाण्णा कुंभार जयंती) : कोल्हापुरात बुधवारी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त शहाजी लॉ कॉलेजमधील बहुउद्देशीय सभागृहाची पायाभरणी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेजारी विश्वनाथ मगदूम, व्ही. एन. पाटील, वैभव पेडणेकर, आदी उपस्थित होते.