शरद कारखाना येथे आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:35+5:302021-02-05T07:02:35+5:30
खोची : नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखाना येथे अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...

शरद कारखाना येथे आरोग्य तपासणी
खोची : नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखाना येथे अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जयसिंगपूर येथील शल्यचिकित्सक प्रमाणक पायोस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. प्राची कुलकर्णी यांनी विविध तपासण्या केल्या.
तपासणी शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक बबन भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी, सी. बी. बिरनाळे, आर. बी. पाटील, बळवंत बेलेकर, लेबर ऑफिसर अमोल मगदूम,डॉ. रिंकल कांबळे, अनिल चौगुले, चंद्रकांत मगदूम, विलास कदम, महावीर ऐनापुरे, चंद्रकांत पाटील, मनोहर कुलकर्णी, माणिक बाबर उपस्थित होते.
फोटो ओळी-नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन संचालक बबन भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस. एन. डिग्रजे, बी. ए. आवटी, सी. बी. बिरनाळे, डॉक्टर उपस्थित होते.