जेवण का देत नाहीस म्हटल्यावर केला चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST2021-09-17T04:30:09+5:302021-09-17T04:30:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जेवण वेळेत का देत नाही याचा जाब विचारल्याबद्दल थेट खाद्यपदार्थ विक्रेत्यानेच तिघांजणांवर चाकूने हल्ला ...

जेवण का देत नाहीस म्हटल्यावर केला चाकूहल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : जेवण वेळेत का देत नाही याचा जाब विचारल्याबद्दल थेट खाद्यपदार्थ विक्रेत्यानेच तिघांजणांवर चाकूने हल्ला करीत जखमी केले. ही घटना कळंबा साईमंदिरजवळ घडली. याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली असून संशयित पंकज विभूतेसह अन्य तिघांवर गुन्हा नोंद झाला. स्वरुप बाळासो माळी (वय ३०, रा. साने गुरुजी वसाहत) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी माळी हे मित्र सुजित गजानन भोसले, आदित्य मिलिंद नागवेकर (दोघेही रा. मंगळवार) असे तिघेजण कळंबा येथील साईमंदिरालगतच्या खाऊ गल्लीत एका चायनीज सेंटरवर जेवणासाठी गेले होते. यावेळी ऑर्डर देऊनही ती बराच वेळ झाला तरी मिळाली नाही. त्यामुळे फिर्यादीने संशयित विभूते यांना जाब विचारला. त्यामुळे चिडून संशयिताने फिर्यादीसह अन्य मित्रांवर कांदा कापायच्या सुरीने हल्ला केला. यात अन्य संशयितांनी मित्रांना पकडून ठेवले व संशयिताने हल्ला केला. फिर्यादी व त्याच्या मित्रांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा नोंद झाला. तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहेत.