शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
7
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
8
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
9
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
10
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
11
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
13
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
14
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
15
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
16
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
17
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
19
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
20
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
Daily Top 2Weekly Top 5

कावळाच बनला त्याचा जिवाभावाचा सखा,तो’ अंगाखांद्यावर बागडतो अन् त्यानेच चारलेला खाऊ खातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:00 IST

पोर्ले तर्फ ठाणे : झाडाची फांदी तोडल्यामुळे मायेच्या उबेला पोरका झालेल्या कावळ्याच्या पिलांना, त्यानं सजिवातील माणुसकी दाखवत घरी आणलं.

ठळक मुद्देपोर्ले तर्फ ठाणेतील पक्षिमित्राची अनोखी कथा‘

सरदार चौगुले ।पोर्ले तर्फ ठाणे : झाडाची फांदी तोडल्यामुळे मायेच्या उबेला पोरका झालेल्या कावळ्याच्या पिलांना, त्यानं सजिवातील माणुसकी दाखवत घरी आणलं. त्या पिलांचे पोटच्या पोरासारखं संगोपन केलं; पण तिघा भावंडांपैकी दोघेजण पंख फुटल्यावर आकाशात भरारी घेऊन आपल्या दुनियेत निघून गेले, तर एकजण त्याच्या अंगाखांद्यावर बागडतो आणि त्यानेच अन्नाचे घास चारले तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. ही कहाणी आहे माणसाळलेल्या कावळ्याची. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील युवराज शेवाळे या पशुपक्ष्यांशी ऋणानुबंध जोडणाऱ्या अवलियाची.

माणसाला आवड किंवा छंद कधीच स्वस्त बसू देत नाही. लहानपणापासून पशुपक्ष्यांबाबत ओढ असणाºया युवराजने खासगी नोकरी सोडून प्रपंचासाठी पशुपालनासोबत पक्षीसंगोपन केले. युवराजच्या मनावर संसाराचा कितीही ताण असला तरी कावळ्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर युवराजला समाधान मिळते. दोघांना एकमेकांची भाषा समजत नसली तरी हावभावातून जिव्हाळ्याचे संबंध आणखी घट्ट होताना दिसत आहे.

दोन महिन्यांपूर्वी युवराज कोल्हापूरहून गावाकडे येत होता. कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील चिखली फाट्याजवळ वडाच्या तुटलेल्या फांदीत कावळ्याच्या घरट्यात तीन पिलांचा मायेच्या उबेसाठीचा किलबिलाट ऐकून त्यांना घरी आणलं. चोची वर करून भुकेसाठी व्याकूळ झालेल्या पिलांना बोटाने कावळ्याची चोच बनवून त्यांच्या पोटात अन्नाचा घास ढकलावा लागत होता. कावळ्याच्या पिलांचे कुटुंबातील सदस्याप्रमाणे संगोपन करण्यात शेवाळे कुटुंब वेळ देत होते. बघता बघता दोन महिन्यांत कावळ्याची पिल्ली मोठी झाली अन् पंख फुटल्याने आकाशात गगनभरारी घेऊ लागली.

एक दिवशी तीन कावळ्यांपैकी दोन कावळे भावंडाला सोडून आपल्या जगात भूर्रकन उडून गेले; पण आपल्याला दिलेल्या मायेची जाणीव ठेवून त्यातील एक कावळा सध्या शेवाळे कुटुंबाचा अविभाज्य घटक बनून राहिला आहे. तो कावळा युवराजच्या हाताने अन्न खातो आणि दिवसरात्र परसातील झाडावर वास्तव्यास असतो. त्याला बोलवलं की तो त्याच्या अंगाखांद्यावर बसतो, बागडतो. त्याच्याकडे कानाडोळा केला तर टोचून आपली भावना व्यक्त करतो. त्यांच्या परड्यात झाडाझुडपात या कावळ्यामुळे अनेक पक्ष्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेवाळे कुटुंबात माणसाळलेल्या या कावळ्याचा विषय परिसरात कुतूहलाचा बनला आहे.कावळ्याबाबत गैरसमजुतीमाणसाच्या दशक्रियाविधी दिवशी कावळ्याने पिंडाला शिवले की माणसाचा आत्मा मुक्त होतोे; असे अनुभवी वास्तव आहे. तरीसुद्धा कावळ्यांचे घरावरती दंगा करणे, डोक्यावर कावळा बसणे अथवा चोचीने टोचणे, आकाशाकडे तोंड करून कावकाव करणे अशा अनेक प्रकारच्या कावळ्याच्या कृतीला अपशकुनतेची जोड दिली आहे; पण युवराजच्या अंगाखांद्यावर खेळणाºया कावळ्याच्या वास्तवतेने कावळ्याबाबतच्या अंधश्रद्धेला पूर्णविराम दिला आहे.