खास यंत्रणा लावा, आरोपीला अटक करा

By Admin | Updated: July 27, 2014 01:07 IST2014-07-27T00:55:19+5:302014-07-27T01:07:17+5:30

बसर्गे ग्रामस्थांचे पोलिसांना साकडे : उद्या हलकर्णीत तर गुरुवारी गडहिंग्लजमध्ये मोर्चा

Have a special mechanism, arrest the accused | खास यंत्रणा लावा, आरोपीला अटक करा

खास यंत्रणा लावा, आरोपीला अटक करा

गडहिंग्लज : बसर्गे येथे कॉलेजला जाण्यासाठी एस. टी.बसची वाट पाहत थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी खास यंत्रणा लावा, त्याला त्वरित अटक करा, अशी मागणी बसर्गे ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे आज, शनिवारी केली.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन दिले. विशेष म्हणजे गिजवणे येथील तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही निवेदन दिले. बसर्गेच्या शिष्टमंडळात सरपंच श्रीपती चौगुले, उपसरपंच मुत्ताप्पा जोडगुद्री, जि. प. सदस्य, जयकुमार मुनोळी व शिवप्रसाद तेली, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी, भीमराव चौगुले यांचा समावेश होता. गिजवणेच्या शिष्टमंडळात सरपंच संजना मुळे, तटामुक्त समिती अध्यक्ष अशोक मोहिते, जिलानी म्हाबरजी, बी. जी. डायस, पुष्पा पोटजाळे, नंदा कमते यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
 

Web Title: Have a special mechanism, arrest the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.