हौसाबाई गवळी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:09+5:302021-09-14T04:29:09+5:30
कोल्हापूर : शाहूपुरी पहिली गल्लीतील हौसाबाई शंकर गवळी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा ...

हौसाबाई गवळी यांचे निधन
कोल्हापूर : शाहूपुरी पहिली गल्लीतील हौसाबाई शंकर गवळी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध व्यंकटेश कुशनचे मालक सुरेश गवळी यांच्या त्या मातोश्री होत.
शंकरराव तांबडे-पाटील
कोल्हापूर : साकोली काॅर्नर परिसरातील शंकरराव लक्ष्मणराव तांबडे-पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, दोन भाऊ, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. जुने टिंबर व्यावसायिक म्हणून ते प्रसिध्द होते.
उमा पदमले
कोल्हापूर : क्रांतीसिंह नाना पाटील नगरातील उमा अशोक पदमले (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कृष्णात तानुगडे
कोल्हापूर : कसबा बावडा पाटील गल्लीतील कृष्णात शंकरराव तानुगडे (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी आहे.
लक्ष्मीमती मगदूम
कोल्हापूर : पट्टणकोडोलीतील लक्ष्मीमती आण्णासाहेब मगदूम (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रघुनाथ कुंभार
कोल्हापूर : सांगवडे येथील रघुनाथ ज्ञानदेव कुंभार (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.
शकुंतला पुरेकर
कोल्हापूर : शाहूपुरी सहाव्या गल्लीतील शकुंतला आनंदराव पुरेकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जनकाबाई परीट
कोल्हापूर : कसबा बावडा-जयभवानी गल्लीतील जनकाबाई बापू परीट (वय १०७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्वतंत्र वापरावी..
उद्योजक मदनराव कुलकर्णी यांचे निधन
कोल्हापूर : टाकाळा, माळी काॅलनीतील मदनराव शंकरराव कुलकर्णी-दत्तवाडकर (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शाहूपुरीतील प्रसिद्ध महाराष्ट्र मशिनरी कंपनीचे संस्थापक होते. वूमेन्स डेव्हलपमेंट फौंडेशनचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष उद्योजक प्रशांत कुलकर्णी यांचे ते वडील होत.