शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथोपियातील ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
4
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
5
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
6
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
7
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
9
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
10
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
11
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
12
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
13
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
14
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
15
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
16
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
17
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
18
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
19
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
20
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले नगराध्यक्षपद खुले झाल्याने घमासान, इच्छुकांची संख्या वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:08 IST

हातकणंगले : येथील नगराध्यक्षपद खुले झाल्याने महायुती आणि महाआघाडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे. भाजपाकडून माजी नगरसेवक राजू इंगवले, शिंदे ...

हातकणंगले : येथील नगराध्यक्षपद खुले झाल्याने महायुती आणि महाआघाडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे. भाजपाकडून माजी नगरसेवक राजू इंगवले, शिंदे सेनेकडून माजी सरपंच अजितसिंह पाटील तर काँग्रेसकडून पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक वाडकर प्रमुख दावेदार आहेत. गत निवडणुकीत अनुसूचित जातीचे आरक्षण होते. सत्ता भाजपा - शिंदेसेनेकडे तर नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला होता. एकत्रित शिवसेनेमधील सर्व नगरसेवक खासदार धैर्यशील माने यांच्याबरोबर शिंदेसेनेत सामील झाले.राज्यात महायुतीची सत्ता असली तरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीला मिळते-जुळते घ्यावे लागणार आहे. पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांतूनच ही निवडणूक होण्याचे संकेत आहेत. आमदार अशोकराव माने जनसुराज्य पक्षाचे असल्याने त्यांना भाजपा आणि शिंदेसेनेबरोबर जुळवून घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. तर शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपाचे ज्येष्ठ माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले महायुतीची मोट कशी बांधतात, यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hatkanangle Nagaradhyaksha post opens; Increased competition expected among aspirants.

Web Summary : With the Hatkanangle Nagaradhyaksha post now open, competition intensifies among Mahayuti and Mahaaghadi aspirants. Key contenders include Raju Ingwale (BJP), Ajitsinh Patil (Shinde Sena), and Deepak Wadkar (Congress). Local alliances are crucial, and leaders face challenges in forming coalitions for victory.