शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Hatkanangale Lok Sabha : 'दोन्ही आघाड्यातील कारखानदार एकत्र येऊन माझ्याविरोधात...', राजू शेट्टींनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 17:37 IST

Hatkanangale Lok Sabha : दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलो. सुरुवातीला अनुकूलता दाखवली, मात्र कुठून काय चाव्या फिरल्या माहित नाही, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. '

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. ठाकरे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. आता शिंदेसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, मविआचे सत्यजित पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचितचे डी. सी. पाटील अशी लढत तेथे होणार आहे, या मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठींबा देणार असल्याची चर्चा होती. पण, आता ठाकरेंनी उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक जोरदार होणार आहे. 

धाराशिवमध्ये महायुतीकडून 'अर्चना पाटील'; पती भाजपा आमदार, पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार

आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबत माहिती दिली. "निवडणुकीत लढत किती रंगी असावी हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. निवडणूक लढवणं हे माझं काम आहे, निवडणूक कितीही रंगी होऊद्या मा तयारी केरत आहे. मत विभागणीची चिंता जे उमेदवार करत त्यांनी करावी मी काळजी करत नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले. 

"पहिल्यापासून महाविकास आघाडीसोबत जायचं नाही हा निर्णय पक्का होता, महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात उसाची एफआरपी तीन टप्प्यात करण्यात आली. जो निर्णय शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवणारा होता, यासाठी आम्हाला संघर्ष करुन एक रक्कमी एफआरपी करुन घ्यावी लागली, आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचे कायदे होत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलो. यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत निवडणुकीत येणार नाही असे आम्ही म्हणालो होतो, असंही शेट्टी म्हणाले. 

"दोन्ही आघाड्यामधील कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान" 

"गेल्या तीन निवडणुका मी या मतदारसंघातून लढलो आहे. यामुळे मत विभागणीची काळजी आम्हाला करायची गरज नाही, मात्र यामध्ये मतांची भर पडली तर निवडणूक सुखकर होईल. यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत चर्चा केली. यासाठी दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलो. सुरुवातीला अनुकूलता दाखवली, मात्र कुठून काय चाव्या फिरल्या माहित नाही, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. 'दोन्ही आघाड्यामधील कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान करत आहेत, मात्र पुन्हा एकदा त्यांना आम्ही मैदानात लोळवू. त्यांचं आणि आमचा उद्देश सेम होता, यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली मात्र त्यांनी दुसरा उमेदवार दिला याबद्दल माझी काहीही तक्रार नाही, असंही शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४