हातकणंगले - बिरदेव यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ
By Admin | Updated: October 20, 2016 16:47 IST2016-10-20T16:47:53+5:302016-10-20T16:47:53+5:30
पट्टणकोडोली येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात प्रारंभ झाला.

हातकणंगले - बिरदेव यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ
ऑनलाइन लोकमत
हातकणंगले, दि. २० - पट्टणकोडोली येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या निनादात श्री विठ्ठलबिरदेवाच्या नावानं चांगभल च्या गजरात श्री फरांडेबाबांनी (खेलोबा वाघमोडे) ऐतिहासिक हेडाम सोहळ्याचे दर्शन घडविले. हेडाम खेळताना फरांडेबाबा मानाच्या तलवारीने आपल्या पोटावर वार करून घेतले यावेळी गर्दीतून विठ्ठलबिरदेवाच्या नावानं चांगभल चा अखंड गजर सुरू होता. त्यांनी प्रसिद्ध भाकणुक ही केली.
यावेळी भंडारा, खारका, खोबरे व लोकर याची प्रचंड उधळणीने वातावरण भक्तिमय बनले होते. भक्तांनी सुमारे 35 टन भंडा-याची उधळण यावेळी करण्यात आली. त्यामुळे पट्टणकोडोली परिसर सुवर्णमय बनला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश व गोवा राज्यांतून भाविक यात्रेसाठी पट्टणकोडोलीत दाखल झाले आहेत.