हसन मुश्रीफ आठवडाभर राज्याच्या दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:30+5:302021-01-23T04:25:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे आठवडाभर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये रायगड, पुणे, अहमदनगर जिल्ह्यासह ...

हसन मुश्रीफ आठवडाभर राज्याच्या दौऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे आठवडाभर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये रायगड, पुणे, अहमदनगर जिल्ह्यासह मंत्रालयातील कामकाजाचा सभावेश आहे.
आज, शनिवारी म्हसळा (जि. रायगड) पंचायत समिती नवीन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आहे. उद्या, रविवारी अकोले (जि. अहमदनगर) येथे माजी आ. यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व शेतकरी मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी डॉ. राकेश गांधी यांच्या सुरभी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व सागर गडाख यांच्या ॲपल हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता पुण्यातील शासकीय विश्रामगृहावर ग्रामप्रज्ञा मोबाइल लॉन्चिंग होणार आहे.
सोमवार (दि. २५) सकाळी साडेदहा वाजता अकोळनेर (जि. अहमदनगर) येथील जिल्हा पंचायत संसाधन केंद्र इमारत भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी एक वाजता अहमदनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद व सात वाजता तनपुरे ट्रॅक्टरच्या शोरूमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी (दि. २६) अहमदनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी साडेदहा वाजता अनुशक्तीनगर- वरवंडी (ता. राहुरी) येथे हिंदुस्तान ॲग्रो को. ऑपरेटिव्ह प्रकल्पाची पाहणी, साडेचार वाजता भाळवणी (ता. पारनेर) येथील साईराज पतसंस्थेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन होणार आहे. बुधवार (दि. २७) व गुरुवारी (दि. २८) मंत्रालयीन कामकाजानिमित्त मुंबईत असून शुक्रवारी (दि. २९) ते कोल्हापुरात येणार आहेत.