शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफांनी समरजित घाटगेंना दिल्या विधानसभेसाठी शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:43 IST

..तर संजय मंडलिक आता कसे काय सांगू शकतील?

कागल : लोकसभा निवडणुकीसाठी कागल तालुक्यातील तिन्ही गटांचे वेगवेगळे मेळावे झाले आहेत. आता त्यांची इच्छा असेल तर एकत्रित मेळावाही घेऊया. विधानसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांची भूमिका काय हे या निवडणुकीत त्यांना विचारले तर ते कसे काय सांगू शकतील? म्हणून कोणीही हा विषय घेऊ नये. कागल विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर समरजित घाटगे हे विधानसभा लढवणार आहेत. त्यांनी तशी घोषणाही केली आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केले.येथील शाहू हाॅलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. तेव्हा ते बोलत होते. कागलसारखी राजकीय परिस्थिती चंदगड, राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदारसंघातही आहे; पण शेवटी सटवीने ज्याच्या कपाळावर जे लिहिले आहे, ते मिळणारच आहे. परमेश्वराला जे मान्य आहे तेच होणार आहे. हा विचार करून सर्वांनी एकत्रित काम करूया. तिन्ही मतदारसंघातून मोठे मताधिक्य मंडलिक यांना मिळेल, असेही ते म्हणाले. यावेळी शामराव पाटील, संजय चितारी, नितीन दिंडे, विजय काळे, शशिकांत नाईक, अजित कांबळे, प्रकाश गाडेकर, भय्या माने यांची भाषणे झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे