जनतेच्या हृदयातील लोकनेता म्हणजे हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST2021-04-20T04:24:33+5:302021-04-20T04:24:33+5:30
आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ता असूदे अगर महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील कार्यकर्ता असुदे मला फक्त काम सांगा, असे थेट म्हणणारे नेतृत्व म्हणजे ...

जनतेच्या हृदयातील लोकनेता म्हणजे हसन मुश्रीफ
आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ता असूदे अगर महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील कार्यकर्ता असुदे मला फक्त काम सांगा, असे थेट म्हणणारे नेतृत्व म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ होय. जनतेवर आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यावर अपार प्रेम करणारा व मदतीला धावून जाणारा लोकनेता अशी त्यांची निर्माण झाली आहे.
देशाचे नेते शरद पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर मंत्रीमंडळातील वजनदार पदे देऊन मोठा विश्वास दाखवला आहे. ग्रामविकास व कामगार मंत्री म्हणून काम करत असताना मुश्रीफ साहेबांनी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते व शरद पवार यांचे अतिशय जवळचे विश्वासू म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. पक्षाने व पक्षनेत्यांनी दिलेल्या जबाबदारी व आदेश अंतिम मानून मंत्री मुश्रीफ यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
इतिहास उगाळत बसण्यापेक्षा वर्तमानाची साथ घेऊन उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील एक आदर्श मतदारसंघ म्हणून कागल- गडहिंग्लज -उत्तुर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. चिकोत्रा खोऱ्यात विकास कामांची प्रचंड कामे करून मंत्री मुश्रीफ यांनी या परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले आहे. जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या या नेत्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!!!
शशिकांत खोत( मा. पं.स. सदस्य)