शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी मला नेहमी फसवलं; आगामी विधानसभा लढवणारच : ए. वाय. पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 15:22 IST

के. पी. पाटील कार्यकर्त्यांना आमिषे दाखवत आहेत

अमर मगदूम राशिवडे : समाजकारण, राजकारण करत असताना मी नेहमी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. सर्व सामान्य कार्यर्त्याला मोठा करण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवले, पायाला पाने बांधून नेहमी पक्षनिष्ठा ठेवली. राष्ट्रवादी मोठी करण्यासाठी दिवस रात्र राबलो, शेवटी पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांनी मला विधानसभा व बिद्री कारखान्याचे अध्यक्षपदाचा शब्द देत नेहमी फसवले. माझं राजकारण संपविण्याचे काम केले. त्यामुळेच राधानगरी भूदरगड तालूक्याच्या विकासासाठी आगामी विधानसभा लढवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. ते सोळांकूर (ता. राधानगरी) येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.काल ए. वाय. पाटील समर्थकांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ व बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. पाटील पुढे म्हणाले, बिद्रीत झालेल्या पराभवात पाठीशी न राहता ज्यांना आम्ही पद देत त्यांना मोठे केले, तेच लोक माझ्या पडत्या काळात सोडून गेले हे मोठे दुःख आहे. या लोकांना जनता माफ करणार नाही. आतापर्यंत वैयक्तिक विचार न करता सर्व सामान्यांच्या हितासाठी राजकारण केले. स्वाभिमानी जनतेच्या विश्वासावर व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आगामी २०२४ विधानसभेची निवडणूक लढणारच असे जाहीर केले.भोगावतीचे उपाध्यक्ष राजेंद्र कवडे, भोगावतीचे विद्यमान संचालक अविनाश उर्फ नंदू भाऊ पाटील, मानसिंग पाटील, महादेव कोथळकर, नेताजी पाटील, विलास हळदे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डी. बी. पाटील, मोहन पाटील, के. डी. चौगले, दिपक पाटील, अमर पाटील, विजय तौदकर, बाळासो धोंड, भुदरगड तालुक्यातील कार्यकार्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांना आमिषेसत्तेचा गैरवापर करीत बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील कार्यकर्त्यांना आमिषे दाखवत आहेत. अनेकांना वेगवेगळी खोटी आश्वासने देवून झुलवत आहेत. 

नव्वद दिवसांत नोकर भरतीचे काय झालेबिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीत के. पी. पाटील केवळ मते मिळविण्यासाठी नव्वद दिवसाच्या आत नोकरी भरती करणार असे आश्वासन दिले होते. त्यामध्ये साठ दिवस पूर्ण झाले, तरी देखील नोकर भरतीच्या कोणत्याच हालचाली चालू नाहीत. बिद्रीच्या नोकरी भरतीचे अश्वासन देवून सत्ता मिळवली पण सभासदांचा विश्वासघात केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफK P. Patilके. पी. पाटीलA. Y Patilए. वाय. पाटीलradhanagari-acराधानगरी