शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif ED Raid: '..तर मुश्रीफ ईडी कार्यालयात का गेले नाहीत, ५२ तास अज्ञातवासात का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 12:07 IST

ईडीचे अधिकारी चौकशीला आल्यानंतर सामोरे न जाता कुटुंबास वाऱ्यावर सोडून मागच्या दारातून मुश्रीफ आणि त्यांची मुले का पळून गेली?

कोल्हापूर : ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासंंबंधी समन्स बजावल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सोमवारीच कार्यालयात जाणे अपेक्षित होते. पण ते स्वत: न जाता आपल्या वकिलास पाठवले. मंगळवारी न्यायालयाने दणके दिल्यानेच ते ईडी कार्यालयात गेल्याचा आरोप भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

ईडीचे अधिकारी चौकशीला आल्यानंतर सामोरे न जाता कुटुंबास वाऱ्यावर सोडून मागच्या दारातून मुश्रीफ आणि त्यांची मुले का पळून गेली? मुश्रीफ ५२ तास फरार आणि अज्ञातवासात का होते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.घाटगे म्हणाले, तुमच्यात वाघाचे काळीज होते तर भाभी म्हणजे तुमच्या पत्नीस व घरातील सुना, मुलांना घरी एकटे सोडून कसे काय पळून जाऊ शकता? कुटुंबाला वाऱ्यावर सोडला तसे मतदारसंघ, शेतकरी, बँकेला वाऱ्यावर तुम्ही सोडणार नाही का? ईडीच्या समन्सविरोधात मुश्रीफ उच्च न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयाने त्यांना समन्सनुसार ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.

ते दोषी नाहीत तर संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्याप्रमाणे ईडी कार्यालयात जाऊन चौकशीला सामाेरे का गेले नाहीत. जिल्हा बँकेचे मुश्रीफ अध्यक्ष आहेत. तुमच्याबाबत ईडीच्या कारवाईचा ससेमिरा सुरू असल्याने बँकेची बदनामी होत नाही का, अशी विचारणा घाटगे यांनी केली.दिलासा नाहीघाटगे म्हणाले, संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद फसवणुकीचा गुन्हा शेतकऱ्याने मुरगूडमध्ये दाखल केला आहे. त्याविरोधात ते न्यायालयात गेले. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना एक महिन्यात म्हणणे मांडण्याची मुदत दिली. हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्याचा सोयीनुसार अर्थ लावून कोर्टाने दिलासा दिल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरविल्या.सीए गायबसरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यांचे ताळेबंद तयार करणारे सीए महेश गुरव गायब आहेत. त्याचे गौडबंगाल काय, असाही प्रश्नही घाटगे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय