शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif ED Raid: ईडीच्या छापेमारीविरोधात मुश्रीफ समर्थक संतप्त, जमिनीवर डोके आपटून घेतल्याने एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 11:56 IST

मुश्रीफांच्या निवासस्थानासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला

जहांगीर शेखकागल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईने  संतप्त झालेल्या एका मुश्रीफ समर्थकाने सीआरपीएफ जवानांच्या समोर जमिनीवर डोके आपटून घेतल्याने तो जखमी झाला.  सागर दावणे (वय 33 रा. दावणे वसाहत कागल) असे त्याचे नाव आहे. जखमीस उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मुश्रीफांच्या निवासस्थानासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. सागर देवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचा पदाधिकारी असुन त्यांने छातीवर मुश्रीफ यांचे छायाचित्र गोंदुन घेतले आहे. कोल्हापूरचे माजी नगरसेवक राजू लाटकर, भय्या माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शितल फराकटे आदी कार्यकर्त्यांना शांत करीत आहेत. बंदोबस्तास आलेल्या पोलिसांशी समर्थकांची बाचाबाची होत आहे.'सारखं येऊन त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या झाडा'दरम्यान, ईडीला सांगा सारख येऊन आम्हाला त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या झाडा अशी संतप्त भावना आमदार हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना अश्रुही अनावर झाले. निवासस्थाना समोर गेट जवळ येऊन त्यानी माध्यमासमोर भावना व्यक्त केल्या.    कागलमध्ये तणावाची परिस्थिती दीड महिन्यांत तिसऱ्यांदा ईडीने मुश्रीफांच्या निवासस्थानी छापेमारी केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कागलमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारीच उच्च न्यायालयाकडून हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला होता. मुश्रीफांवर २४ एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. यातच आज, शनिवारी सकाळी ईडीचे पथक मुश्रीफांच्या निवासस्थानी धडकले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय