शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हरियाणा, नांदेड, शिमला, पतियाळा, लुधियाना संघांची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:44 IST

प्रत्युत्तरादाखल खेळताना नागपूर विद्यापीठाने १८.५ षटकांत सर्वबाद ९६ धावांपर्यंत मजल मारली. रितेश पूरकामने ३२ धावा, नीलेश रोटकेने २७ धावा केल्या. गोलंदाजी करताना सिमला संघाकडून सुरेंद्रर सिंगने ४, मुकेश कुमारने २ गडी बाद केले. सामन्यात एच. पी. युनि. सिमला संघाने ७३ धावांनी विजय मिळविला.

ठळक मुद्देअखिल भारतीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर : अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात लाला लजपतराय विद्यापीठ हरियाणा, नांदेड विद्यापीठ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, एच.पी.यू. सिमला संघ, पंजाब विद्यापीठ पतियाळा, पंजाब विद्यापीठ, लुधियाना या संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत आगेकूच केली. शिवाजी विद्यापीठ व राजाराम कॉलेजच्या मैदानांवर हे सामने झाले.

पहिला सामना हरियाणा येथील लाला लजपतराय विद्यापीठ विरुद्ध सेंट्रल युनिव्हर्सिटी, जम्मू यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना लाला लजपतराय विद्यापीठ संघाने तीन गडी गमवून २८८ धावा केल्या. यामध्ये अनिल कुमारने १४६, विकास ठाकूरने ७२ धावा केल्या. गोलंदाजी करताना सेंट्रल युनिव्हर्सिटी संघाच्या इकबाल भटने दोन गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट्रल संघाने सर्वबाद फक्त ४७ धावा केल्या. गोलंदाजी करताना हरियाणा संघाकडून सतबीर शर्मा याने पाच गडी बाद केले. ‘सामनावीर’चा बहुमान हरियाणाचा अनिल कुमार याला देण्यात आला. हरियाणा संघाने सामन्यात २३४ धावांनी विजय मिळविला.

दुसरा सामना नांदेड विद्यापीठ विरुद्ध गोरमपूर विद्यापीठ यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना गोरमपूर विद्यापीठ संघाने सर्वबाद ९७ धावा केल्या. गोलंदाजी करताना नांदेड संघाकडून जयराम हंबरडे, गोविंद सोनटक्के, शैलेश कांबळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नांदेड विद्यापीठ संघाने १२.२ षटकांत दोन बाद १०१ धावा केल्या. यामध्ये नरसी मुगाडेने ३९, तर अजमेर बिडला याने नाबाद ३० धावा केल्या. गोलंदाजी करताना गोरमपूर विद्यापीठ संघाकडून जया शंकर सिंग, सुरिंदर यादव, मनीष श्रीवास्तव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. नांदेड संघाने ८ गडी राखून विजय मिळविला.

तिसरा सामना जामिया मिलिया इस्लामिया विरुद्ध के. बी. सी. एन. एम. यू. जळगाव संघात झाला. प्रथम फलंदाजी करताना जळगाव संघाने २० षटकांत ७ गडी गमवून ८४ धावा केल्या. यामध्ये शशीकांत शिरसाटने २८, अरविंद गिरगावने २६ धावा केल्या. जामिया संघाकडून गोलंदाजी करताना महंमद अखलाकने तीन गडी बाद केले; तर सरफराज मसूदने दोन गडी बाद केले.प्रत्युत्तरादाखल खेळताना जामिया विद्यापीठ संघाकडून जामिया संघाने ९.२ षटकांत दोन गडी बाद ८५ धावा केल्या. यामध्ये जामिया संघाकडून महंमद वाहीदने २४, साद कारिमीने नाबाद ३० धावा केल्या. गोलंदाजी करताना जळगाव संघाकडून दीपक मोरने १ गडी बाद केला. सामन्यात जामिया इस्लामिया संघाने ८ गडी राखून विजय मिळविला.

एच.पी. युनि. सिमला संघ विरुद्ध आर.टी. एम. नागपूर यांच्यामध्ये सामना झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एच. पी. युनि. सिमला संघाकडून २० षटकांत ८ बाद १६९ धावा केल्या. यामध्ये राजेश चौहानने ७८ धावा, मुकेशकुमारने ३७ धावा केल्या. गोलंदाजी करताना आर. टी. एन., नागपूर संघाकडून महेंद्र बनकरने ३, दीपक घोडमारेने २ गडी बाद केले.प्रत्युत्तरादाखल खेळताना नागपूर विद्यापीठाने १८.५ षटकांत सर्वबाद ९६ धावांपर्यंत मजल मारली. रितेश पूरकामने ३२ धावा, नीलेश रोटकेने २७ धावा केल्या. गोलंदाजी करताना सिमला संघाकडून सुरेंद्रर सिंगने ४, मुकेश कुमारने २ गडी बाद केले. सामन्यात एच. पी. युनि. सिमला संघाने ७३ धावांनी विजय मिळविला.

पंजाब विद्यापीठ, पतियाळा विरुद्ध डॉ. पी. डी. के. व्ही. अकोला संघ यांच्यामध्ये सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना अकोला संघाने सर्वबाद ९३ धावा केल्या. यामध्ये नीरज सातपुते याने २६, जगदीश परमारने १९ धावा केल्या. गोलंदाजी करताना पंजाब विद्यापीठ संघाकडून गुरुप्रीत सिंहने ३, प्रीतपालने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाब विद्यापीठ संघाकडून १२ षटकांत दोन गडी गमवून ९४ धावा केल्या. पंजाब पतियाळा संघाकडून गुरुप्रीत सिंहने नाबाद ३१, प्री्रतपाल सिंहने २८, पंकज प्रशारने १५ धावा केल्या. अशा प्रकारे पंजाब पतियाळा संघाने ८ गडी राखून विजय मिळविला.

पंजाब विद्यापीठ, लुधियाना विरुद्ध शेर-ए-काश्मीर विद्यापीठ, जम्मू यांच्यामध्ये सामना झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शेर-ए-काश्मीर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १०१ धावा केल्या. यामध्ये नीरज मनहासने ४१ धावा केल्या. विनोद कुमारने २४ धावा केल्या. गोलंदाजी करताना पंजाब विद्यापीठ संघाकडून सिंगने ५ गडी बाद केले. विनोद कुमारने २ गडी बाद केले.प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाब विद्यापीठ, लुधियाना संघाकडून १२.५ षटकांत चार गडी गमवून १०२ धावा केल्या. पंजाब विद्यापीठ संघाकडून समरजित सिंगने ६५ केला. अशा प्रकारे लुधियाना पंजाब विद्यापीठ संघाकडून ६ गडी राखून विजय मिळविला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ