शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियात गाजतेय कोल्हापूरची 'चंद्रा', ठसकेबाज नृत्याचा अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही शेअर केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 11:50 IST

यूट्यूबवर नृत्याचे व्हिडीओ पाहून स्वत: चंद्रा गाण्यावर नृत्य बसवले

कोल्हापूर : चंद्रमुखी चित्रपटातील प्रसिद्ध चंद्रा या गीताने अनेकांना वेड लावले. कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हर्षदा कांबळे या मुलीने यूट्यूबवर पाहून या गाण्यावर नृत्य केले आहे. हर्षदाच्या ठसकेबाज नृत्याचा व्हिडीओ खुद्द अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही सोशल मीडियात शेअर केला आहे.निसर्गसंपन्न अणुस्कुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावीच्या वर्गातील हर्षदा कांबळे हिला नृत्याची आवड आहे. तिचे वडील शेती करतात, तर आई आशासेविका आहे. रिकाम्या वेळेत ती मोबाइलमध्ये यूट्यूबवर नृत्याचे व्हिडीओ पाहते. याच आवडीतून तिने स्वत: चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर नृत्य बसवले. आठ मार्चला महिलादिनी शाळेत शिक्षक अनिल कांबळे यांनी हर्षदाच्या नृत्याचा व्हिडीओ चित्रित केला. गेल्या दोन दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, तो सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.‘दिसला कशानं सख्या सजना, सांग लुकलुकणारा दिवा...’ या गाण्यावरील हर्षदाचे नृत्य पाहणाऱ्यांना सुरुवातीपासून खिळवून ठेवते. शाळेच्या गणवेशात केलेले ठसकेबाज नृत्य, चेहऱ्यावरील समर्पक हावभाव आणि देहबोली यांमुळे अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या नृत्याची आठवण होते. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला असून, त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता, खेड्यातील खरे टॅलेंट, हर्षदाचे अमृताला आव्हान अशा कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विशेष म्हणजे खुद्द अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही हर्षदाच्या नृत्याचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला असून, तिचे कौतुक केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडिया