हार्डवेअर व्यापाऱ्याची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:51+5:302021-07-18T04:18:51+5:30
इचलकरंजी : अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त फायदा मिळेल असे आमिष दाखवून येथील एका हार्डवेअर व्यापाऱ्याची १ कोटी ...

हार्डवेअर व्यापाऱ्याची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी : अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त फायदा मिळेल असे आमिष दाखवून येथील एका हार्डवेअर व्यापाऱ्याची १ कोटी ४० लाख ५१ हजार ८७३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार रमेश नत्तू पटेल (वय ४९, रा. कोल्हापूर रोड, इचलकरंजी ) यांनी दिली आहे. काव्या त्रिपाठी, गॅलेक्सी एफ. एक्स. ट्रेड कंपनीचे मालक संजय पटेल व पार्टनर अर्चना तिवारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रमेश पटेल हे हार्डवेअर व्यापारी आहेत. त्यांचे शेअर मार्केटमध्ये खाते आहे. त्यांना काव्या हिने फोन करून गॅलेक्सी एफ. एक्स. या फॉरेस्ट ट्रेड मार्केटिंग कंपनीतून बोलत असल्याचे भासवून या कंपनीमार्फत अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा फायदा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार रमेश यांनी पत्नी जसोदाबेन यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये भरले. त्याला फायदा दाखवून संजय व अर्चना यांनी विश्वास संपादन करून संगनमताने पुन्हा गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यामुळे पटेल दाम्पत्याची १ कोटी ४० लाख ५१ हजार ८७३ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.