हरळी बुद्रकचा नीलेश राज्यात पहिला

By Admin | Updated: December 3, 2014 00:31 IST2014-12-03T00:30:27+5:302014-12-03T00:31:07+5:30

उत्तूरचा राहूल द्वितीय : ‘पाणलोट क्षेत्र विकास’अंतर्गत शालेय चित्रकला स्पर्धा

Harale Budrach's Nilesh is the first in the state | हरळी बुद्रकचा नीलेश राज्यात पहिला

हरळी बुद्रकचा नीलेश राज्यात पहिला

कोल्हापूर : राज्य कृषी विभाग पाणलोट क्षेत्र विकास चळवळींतर्गत आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात नीलेश विनायक कांबळे (सिम्बायोसिस स्कूल, हरळी बुद्रुक, ता. गडहिंंग्लज) याने राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाचे साडेसात हजारांचे बक्षीस पटकाविले. शाहू स्मारक येथे आज, मंगळवारी हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी सुधर्म जामसांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
माध्यमिक गटातील साडेसात हजारांचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस राहुल निवृत्ती कोकितकर (उत्तूर विद्यालय, उत्तूर, ता. आजरा) याला देण्यात आले. प्राथमिक गटात जिल्हास्तरावर तेजस भगवान कांबळे (केंद्रीय शाळा शिवारे माणगाव, ता. शाहूवाडी), अथर्व रणधीर जाधव (आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव, ता. हातकणंगले), ओम सुनील शिंदे (सानेगुरुजी विद्यामंदिर, कुरुंदवाड, ता. शिरोळ) यांना अनुक्रमे २०००, १०००, ५०० रुपयांचे रोख बक्षीस दिले.
माध्यमिक गटातील विजेते नीलेश विनायक कांबळे (सिम्बायोसिस स्कूल, हरळी बुद्रुक), प्राची विवेक देसाई (कुमार भवन, कडगाव, ता. भुदरगड), श्रेयस दीपक नागावकर (आदर्श विद्यानिकेतन, मिणचे, ता. हातकणंगले) यांना अनुक्रमे ४०००, २५००, १५०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
सुलेखा भिसे यांच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुशीला सांस्कृतिक मंडळाने ‘पाणी वाचवा, प्रदूषण थांबवा’, ‘शेतीचा अभिमान बाळगा’ या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. कांचनताई परुळेकर यांनी स्पर्धेची माहिती दिली. डॉ. नंदकुमार कदम, एन. एस. परीट यांचे भाषण झाले.
कार्यक्रमात जिल्ह्णातील ८४ विद्यार्थ्यांना ४५ हजारांची बक्षिसे देण्यात आली. रोटरी क्लब आॅफ सनराईजने सर्व विजेत्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Harale Budrach's Nilesh is the first in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.