‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव !

By Admin | Updated: January 16, 2015 00:42 IST2015-01-16T00:11:28+5:302015-01-16T00:42:50+5:30

आठवा वर्धापनदिन : कृषी विशेषांकाचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती

Happy Holi on Lokmat! | ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव !

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव !

रत्नागिरी : ‘लोकमत’ रत्नागिरी आवृत्तीच्या आठव्या वर्धापनदिनी आयोजित स्नेहमेळाव्यात मान्यवर, वाचक व हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यानिमित्ताने लोकमतने प्रसिद्ध केलेल्या कृषी विशेषांकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. लोकमतचे प्रेसिडेंट करण गेरा, बॅँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक विनायक बुचे, लोकमत जाहिरात विभागाचे सहायक सरव्यवस्थापक (दक्षिण) आलोक श्रीवास्तव, उद्योजक प्रसन्न आंबुलकर, लोकमतचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, आवृत्तीप्रमुख मनोज मुळ्ये, वरिष्ठ शाखा अधिकारी अतुल कामत, जाहिरात उपव्यवस्थापक श्रीराम जोशी, विवेक चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर लोकमतच्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
जिल्ह्यातील कृषी तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव या विशेषांकातून मांडण्यात आले आहेत.
या विशेषांकाचे सर्वस्तरातून कौतुक
करण्यात आले.
या स्नेहमेळाव्याला आमदार उदय सामंत, पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळम, तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीष जगताप, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष संजय साळवी, कोकण कृ षी विद्यापीठाचे माजी कुलगुरू
डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्यासह रत्नागिरीच्या राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी ‘लोकमत’ला यावेळी शुभेच्छा दिल्या. लोकमतने राबवलेल्या उपक्रमांचे कौतुकही यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)

माजी राज्यमंत्र्यांकडूनही शुभेच्छा
माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनीही उपस्थित राहून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या नेहा माने उपस्थित होत्या. ‘लोकमत’कडून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचेही त्यांनी आवर्जून कौतुक केले.


‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा आठवा वर्धापनदिन गुरुवारी उत्साहात झाला. यानिमित्त आयोजित स्रेहमेळाव्याचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन बॅँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक विनायक बुचे यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकमतचे प्रेसिडेंट करण गेरा, जाहिरात विभागाचे सहायक सरव्यवस्थापक (दक्षिण) आलोक श्रीवास्तव, उद्योजक प्रसन्न आंबुलकर, लोकमतचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, आदी उपस्थित होते.

Web Title: Happy Holi on Lokmat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.